election of kolhapur municipal corporation possibility of postponed for 6 months 
कोल्हापूर

कोल्हापूर : हालचाली थंडावल्या, महापालिका निवडणूक सहा महिने लांबणीवर पडण्याची शक्यता

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्त झालेल्या साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचा दौरा कोरोनामुळे लांबणार आहे. त्यामुळे अंतिम मतदार यादी प्रसिद्धीची मुदतही लांबणार आहे. परिणामी महापालिकेची निवडणूक आता आणखीन सहा महिने लांबणीवर पडण्याचीच शक्‍यता आहे.

महापालिकेच्या ऑक्‍टोबर २०१५ मध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत निवडून आलेल्या सभागृहाची मुदत नोंव्हेंबर २०२० मध्ये संपली. नियमानुसार १५ नोंव्हेंबर २०२० ला या सभागृहाची मुदत संपली; परंतु मार्च २०२० पासून देशभरात कोरोनाचे संकट आले आहे. त्याचा सर्वच घटकांवर परिणाम झाला. महापालिकेची निवडणूकही त्याला अपवाद नाही. डिसेंबर २०२० अखेरीस परिस्थिती थोडी सुधारत होती. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून प्रक्रियेचे टप्पे पार पाडण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार २० डिसेंबरला प्रारुप प्रभागरचना आणि आरक्षण सोडत जाहीर केली.

हरकती सूचना प्राप्त करून जानेवारीमध्ये प्रभागरचनाही अंतिम झाली. यानंतर मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर केला. जाहीर कार्यक्रमानुसार १२ मार्चला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार होती; पंरतु कोरोनाचा कहर वाढत गेल्याने पुन्हा मतदार यादी प्रसिद्ध करण्यास मुदतवाढ दिली. दरम्यानच्या काळात पालिका प्रशासनाने मतदार यादी बिनचूक तयार करण्याचे प्रयत्न केले.

प्राप्त १८०० तक्रारीची सूक्ष्म पाहणी करून ही मतदार यादी अंतिम करण्याचे काम केले आहे; पण यासंदर्भात अंतिम निर्णय राज्य निवडणूक आयोग घेणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने त्यासाठी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. गायकवाड यांनी दोनवेळा दौऱ्याचे नियोजन केले; पण दोन्हीवेळा कोवीडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा दौरा रद्द करावा लागला होता.

हालचाली थंडावल्या

कोल्हापूर पालिकेसह इतर पाच पालिकांच्याही निवडणुका होणार आहेत. तेथेही कोवीड स्थिती चिंताजनक असल्याने आता मे अखेरीस निवडणुका होण्याची शक्‍यता मावळली आहे. परिणामी राजकीय पक्ष आणि इच्छुक मंडळीनीही सबुरीने घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe FDA Rules : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

Rohit Sharma on 2027 WC: निवृत्तीची चर्चा सुरूच होती, त्यात रोहित शर्माने २०२७ च्या वर्ल्ड कपबाबत केलं मोठं विधान; चाहत्यांना टेंशन

'जुळून येती रेशीमगाठी' मालिका ८० च्या दशकात असती तर कसे दिसले असते आदित्य- मेघना? AI ने बनवले कमाल फोटो

Ganesh Chaturthi 2026: गणपती बाप्पाला मोदकाचाच नैवेद्य का? जाणून घ्या मोदकामागचा खरा अध्यात्मिक अर्थ!

Marathi News Live Updates : ...तर गरबा उत्सवात सनातनी मुस्लिमांचे स्वागत करण्यास आपण तयार; अमोल ठाकरे यांची माहिती

SCROLL FOR NEXT