Election of Zilla Parishad office bearers mla prakash awade Support kolhapur political news 
कोल्हापूर

जिल्हा परिषदेत घडामोडींना आला वेग :  महाविकास आघाडीसोबत जाणार 'हा' गट

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर :  आगामी जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीत आमदार प्रकाश आवाडे यांचा महाविकास आघाडीला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. आवाडे यांचे समर्थक राजू मगदूम यांनी ही माहिती दिली. आमदार पी. एन. पाटील यांचे पुत्र राहुल पाटील यांना महाविकास आघाडी अध्यक्षपदाची संधी देणार असेल, तर ताराराणी विकास आघाडीच्या दोन्ही सदस्यांचा बिनशर्त पाठिंबा राहील, असेही मगदूम यांनी सांगितले.


जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता आहे. वर्षानंतर पदाधिकारी बदलाचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आठवड्याभरात बदल केला जाणार आहे. त्याअनुषंगाने काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांमध्ये अंतर्गत घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर आवाडे गटाच्या भूमिकेने राजकीय मंडळी अवाक्‌ झाली आहेत. आमदार पाटील व आमदार आवाडे यांच्यात सख्य नाही. गतवेळी राहुल पाटील यांचे अध्यक्षपदासाठी नाव आल्यानंतर आवाडे यांनी विरोध केला होता. त्यामुळे चार वर्षांनी आवाडे यांना पाटील यांचा पुळका येण्याचे कारण काय, याबाबतही चर्चा होत आहे.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

SCROLL FOR NEXT