Elections for post of chairperson of various subjects committees of ichalkaranji municipal 
कोल्हापूर

इचलकरंजीत राजकीय हालचाली गतीमान ; सत्ता कायम की फेरबदल याची उत्सुकता 

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी - येथील पालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती पदाच्या निवडी बुधवारी (ता. 6) श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृह येथे होणार आहेत. याबाबत आदेश आज जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिला. यामुळे राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. पालिकेतील विद्यमान सत्ता कायम राहणार की फेरबदल होणार याची उत्सुकता आतापासूनच वाढली आहे. 

विविध विषय समित्यांच्या सभापती पदाची एक वर्षाची मुदत संपणार आहे. त्यामुळे नवीन निवडीचा कार्यक्रम कधी लागणार आहे, याकडे लक्ष लागले होते. आज याबाबतचा कार्यक्रम जिल्हाधिकारी देसाई यांनी जाहीर केल्यानंतर राजकीय हालचालींना गती आली आहे. 6 जानेवारीला सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत निवडीची प्रक्रिया चालणार आहे. प्रांताधिकारी विकास खरात यांच्या अध्यक्षतेखाली या निवडी होणार आहेत. 
दरवर्षी पालिका सभागृहात निवडीची प्रक्रिया होत होती. मात्र यंदा कोरोनाच्या नियमावलीमुळे निवडीचे ठिकाण बदलले आहे. पालिकेच्या श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात ही निवड प्रक्रिया करण्यात येणार आहे. यावेळी कोरोना नियमावलीची कडक अंमलबजावणी करण्याच्या स्पष्ट सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. निवड प्रक्रियेसाठी होणारी सभा ही ऑफलाईन होणार आहे. याबाबतचा आदेश आज पालिका प्रशासनाला प्राप्त झाला.

 
निवडीचा कार्यक्रम असा 
सकाळी 11 ते 1 - विषय समिती व स्थायी समिती सदस्यांचे नामनिर्देशन करणे 
दुपारी 1 ते 3 - विषय समिती सभापतीपदासाठी मुख्याधिकाऱ्यांकडे नामनिर्देशन पत्र सादर करणे 
दुपारी 3 ते 3.30 - नामनिर्देशने पत्रांची छाननी व प्रकटन करणे 
दुपारी 3.30 ते 4.00 - नामनिर्देशील पत्रे मागे घेणे व शिल्लक पत्रांचे प्रकटन करणे 
दुपारी 4.00- विविध विषय समित्यांच्या सभापती पदाची निवडणूक घेऊन निकाल जाहीर करणे. स्थायी समितीची निवड करणे. 


संपादन - धनाजी सुर्वे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: पावसाचा तांडव... कोलकाता-पंजाब सामना रद्द करावा लागला, १-१ गुणाने नेमका कोणाचा फायदा झाला?

रणवीरने केली अजून एक नक्कल, श्रेया घोषालने सुद्धा दिली साथ, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले... हा नाही सुधारणार

Court Decision: मोठी बातमी! बाप-लेकाच्या मृत्यू प्रकरणात ९ पोलिसांना फाशीची शिक्षा; तामिळनाडूतील कोर्टाचा निर्णय

New Labour Law: कर्मचाऱ्यांची लॉटरी! उरलेल्या सुट्ट्यांवर मिळणार थेट कॅश; एकही Leave वाया जाणार नाही, काय आहेत नवे नियम?

IPL 2026 Controvarsy: बस्सsss झालं... SRH ची मालकीण काव्या मारन संतापली, BCCI कडे आवेश खानसह दोन वादग्रस्त निर्णयाची तक्रार

SCROLL FOR NEXT