Emphasis on home treatment at Corona in Kolhapur health  marathi news
Emphasis on home treatment at Corona in Kolhapur health marathi news 
कोल्हापूर

Covid 19 Update : कोल्हापुरात कोरोनावर घरातच उपचारांवर भर

सदानंद पाटील

कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात ६० टक्‍के रुग्ण घरीच उपचार घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. सध्या ७७३ कोरोनाच्या रुग्णांपैकी तब्बल ४६५ रुग्ण घरात, तर ३०८ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. शहर, पालिका व जिल्ह्यातून आलेल्या माहितीचे विश्‍लेषण केल्यावर ही बाब समोर आली आहे. महत्त्वाचे म्हणजे उच्च रक्‍तदाब, मधुमेह व रक्‍तदाब सोडून हृदयाचे जे इतर आजार आहेत, अशा ५० टक्‍के लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. 

जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. मात्र, गत वेळेस जसा रुग्णांना त्रास झाला, तसा त्रास या वेळी कमी प्रमाणात होत असल्याचे आरोग्य विभागाला निदर्शनास आले आहे. उपचार घेत असलेल्या एकूण रुग्णांपैकी २० लोकांसाठी व्हेंटिलेटर, तर ७० लोकांना ऑक्‍सिजनचा वापर करावा लागत आहे. मागील पंधरा दिवसांत कोरोनाने बाधित असलेल्या बहुतांश रुग्णांवर घरीच उपचार सुरू आहेत. घरीच उपचार सुरू असलेल्या अनेक व्यक्‍तींना कोरोनाची कोणतीच लक्षणे आढळलेली नाहीत. त्यामुळे घरीच स्वतंत्र खोलीत या रुग्णांची व्यवस्था केली आहे. त्याचबरोबर नियमितपणे ऑक्‍सिजन आणि वैद्यकीय तपासणी व औषधोपचार सुरू असल्याने हे रुग्ण कोरोनासारख्या संकटातून बरे होत आहेत.

कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी बाधित व्यक्‍तीच्या संपर्कातील व्यक्‍ती शोधणे व त्यांच्यावर उपचार करणे अत्यावश्‍यक आहे. मात्र, या कामात अजूनही म्हणावी तशी प्रगती नसल्याचे मत आरोग्य विभागाने व्यक्‍त केले आहे. सापडलेल्या ५१ हजार ८०६ बाधित रुग्णांच्या संपर्कात असलेल्या सात लाख ८२ हजार २५४ व्यक्‍तींचा शोध घेण्यात आला. संपर्काची ही टक्‍केवारी १५.४१ आहे. ती आणखी वाढविणे गरजेचे असून, त्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 

या भागात रुग्ण अधिक
शहराप्रमाणेच ग्रामीण भागातील ठराविक भागात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. यात इचलकरंजी, गडहिंग्लज, उचगाव, आर.के.नगर, कागल, जयसिंगपूर, गारगोटी, पाचगाव, भादोले, नागाव, हातकणंगले, कबनूर, रुकडी व कणेरी या गावांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी पाचपेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

गत आठवड्यात कोरोना बाधितांच्या माहितीचे विश्‍लेषण केले. घरीच उपचार घेण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. याचबरोबर रुग्णांत असलेले विविध आजार, कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगसह इतर माहिती उपलब्ध झाली. त्या आधारे उपचारांचे नियोजन सुरू आहे. 
- डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: कोलकाताला तिसरा धक्का! धोकादायक आंद्रे रसेल स्वस्तात बाद

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

SCROLL FOR NEXT