The Encroachment At Ichalkaranji Was Removed Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

इचलकरंजीत फेरीवाल्यांच्या अतिक्रमणांवर हातोडा

पंडित कोंडेकर

इचलकरंजी : पालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाने आजपासून फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावर धडक कारवाई सुरु केली. यामध्ये तीन हातगाडे तसेच दुकानासमोर रस्त्यावर लावण्यात आलेले 16 स्टॅन्ड बोर्ड जप्त करण्यात आले. कारवाईवेळी किरकोळ वादावादी झाली. पहिल्या दिवशी कोल्हापूर नाका ते छत्रपती शिवाजी पुतळा या मार्गावर कारवाई केली. 

शहरात फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढले होते. त्यामुळे वाहतूकीस मोठ्या प्रमाणात अडथळा येत होता. याबाबत नागरिकांच्याही तक्रारी वाढल्या होत्या. अनेक फेरीवाल्यांनी मोक्‍याच्या जागा बळकावल्या होत्या. वास्तविक दिवसभरानंतर रात्री घरी जाताना हातगाडे घरी घेवून जाणे बंधनकारक आहे. पण अनेकांनी कायमस्वरुपी हातगाडे जागेवर ठेवले होते. त्या विरोधात कारवाई करण्याचा इशारा पालिकेने जाहीर नोटीसीद्वारे दिला होता. त्यानुसार आजपासून कारवाईला सुरुवात केली. 

सुरुवातीला एएससी कॉलेजजवळ बंद असलेला नाष्टा सेंटरचा हातगाडा उचलताना वादावादी झाली. हातगाडा मालकाने वाद घातला. फेरीवाल्यांचे नेते सदा मलाबादे यांनीही हुज्जत घातली. त्यामुळे सुमारे तासभर येथे गोंधळ सुरु होता. तासाभरानंतर हा हातगाडा जप्त केला. राजर्षी शाहू पुतळा परिसरातील बंद असलेले दोन हातगाडे या कारवाईत जप्त केले. रस्त्याच्या कडेला बसलेल्या विक्रेत्यांनाही या मोहिमेवेळी हटकले. काही ठिकाणी रस्त्यावरच दुकानाचे स्टॅन्ड बोर्ड लावले होते. त्याचाही अडथळा होत होता. असे तब्बल 16 स्टॅन्ड बोर्ड या कारवाईत जप्त केले. अतिक्रमण निर्मुलन पथकाचे नेतृत्व उपमुख्याधिकारी केतन गुजर यांच्यासह सुभाष आवळे यांनी केले. उद्याही याबाबतची मोहिम सुरुच राहणार आहे. 

राजकीय दबाव झुगारला 
आज फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावर कारवाई सुरु केल्यानंतर पथकावर राजकीय दबाव आणण्यात आला. दोन लोकप्रतिनिधींनी अप्रत्यक्षपणे या कारवाईत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. पण राजकीय दबाव झुगारुन आजची मोहीम राबविण्यात आली. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : आजीबाईने डिलीट केले १२ व्होट..! अर्ज कोणी केला, काय म्हणाल्या गोडाबाई? राहुल गांधींनी समोर आणला 'घोळ'

Latest Maharashtra News Updates : निवडणूक आयुक्तांना १८ वेळा पत्र पाठवले, तरीही काहीही उत्तर मिळाले नाही

Asia Cup 2024 Super 4 Scenario : भारत, पाकिस्तान यांची जागा पक्की; अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश यांना काय करावं लागणार?

ज्ञानेश कुमार मतचोरांचं संरक्षण करतायत, मी पुराव्याशिवाय बोलत नाहीय : राहुल गांधी

iPhone Air! अ‍ॅपलचा कागदासारखा पातळ स्मार्टफोन; कुणी खरेदी करावा अन् कुणी अजिबात घेऊ नये? एकदा बघाच

SCROLL FOR NEXT