the entry in corporation election of maloji raje chatrapati in kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापूरच्या राजांची पुन्हा राजकारणात एन्ट्री ; कोणत्या पक्षाला होणार फायदा ?

युवराज पाटील

कोल्हापूर : शहराच्या जुन्या भागात माजी आमदार मालोजीराजे यांचा असलेला प्रभाव येत्या महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा अनुभवास मिळणार आहे. सक्रीय राजकारणापासून आलिप्त असलेले मालोजीराजे पुन्हा कोल्हापूर उत्तरच्या राजकारणात सक्रीय होत आहेत. पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासोबत मालोजीराजे कॉंग्रेसला ताकद देणार आहेत. 

बुधवार पेठेतील शिपुगडे तालीम. सिध्दार्थनगर, बाजारगेट, शाहूपूरी तालीम,न्यू शाहूपूरी, नागाळा पार्क, ताराबाई पार्क, रमणमळा, उत्तरेश्‍वर पेठ, शिवाजी पेठेतील पद्माराजे उद्यान तसेच मंगळवार पेठेतील काही भागात मालोजीराजेंचा प्रभाव आहे. 2004 ची विधानसभा निवडणूक तत्पुर्वीच्या दोन वर्षात मालोजीराजे यांनी फुटबॉल संघाच्या माध्यमातून दबदबा निर्माण केला. शहरातून शिवसेनेच्या तिकीटावर दोनवेळा आमदार झालेले सुरेश साळोखे यांचा मालोजीराजे यांच्याकडून पराभव झाला. आणि पुढे त्यांच्या राजकारणाला झळाळी मिळाली. 

आमदारकीच्या पाच वर्षाच्या काळात त्यांचा प्रभाव अधिक होता. 2009 च्या निवडणुकीत राजेश क्षीरसागर यांच्याकडून मालोजीराजे यांचा निसटता पराभव झाला. तत्पुर्वी संभाजीराजे यांचा सदाशिवराव मंडलिक यांच्याकडून पराभव झाला होता. दोन्ही पराभवामुळे राजकीय जीवनाची गती मंद झाली. 2014 ला मालोजीराजे यांनी सत्यजित कदम यांना पाठिंबा दिला. त्यावेळी कदम यांचा क्षीरसागर यांच्याकडून पराभव झाला. प्रत्येक अडचणींवर काळ हे उत्तर असते असे म्हंटले जाते. भाजप सत्तेत असताना संभाजीराजे राज्यसभेवर खासदार झाले आणि राजघराण्याच्या राजकारणाला पुन्हा गती येऊ लागली. 

विधानसभा निवडणुकीवेळी मधुरिमाराजे यांच्या उमेदवारीची चर्चा झाली. पुन्हा निवडणूकीपासून दूर राहणे पसंत केले. चंद्रकांत जाधव यांना अनपेक्षितपणे कॉंग्रेसची उमेदवारी मिळाली आणि त्यांनी शिवसेनेकडून दोनवेळा आमदार झालेल्या राजेश क्षीरसागर यांचा पराभव केला. आपल्या हक्काचा मतदारसंघ असूनही आपण आलिप्त असल्याची भावना मालोजीराजेना होती. त्यानी सक्रीय व्हावे यासाठी त्यांचे जुने कार्यकर्ते आग्रही होते. त्यानुसार मालोजीराजे शहराचा जुना भाग तसेच नागाळा पार्क, ताराबाई पार्क, न्यू शाहूपूरी या प्रभागातून कार्यकर्त्यांना ताकद देतील. पालकमंत्री सतेज पाटील यांचा भार हलका करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे.  

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Solapur Highway Accident : टायर फुटून क्रूझर थेट ट्रकवर आदळली, तिघांचा जागीच मृत्यू; गाडीचा चुराडा

Latest Marathi News Live Update : सरकारी कार्यालयात वाढदिवस साजरा केल्याने वाद, मंगळवेढ्यातील प्रकार चर्चेत

Gold Investment: HSBC चा पहिला Gold ETF लॉन्च! गुंतवणूकदार दूर जात असताना मोठी एंट्री; सोन्यात गुंतवणुकीची नवी संधी?  

Google चा मोठा खुलासा! Zero Day मुळे धोक्यात आलेत 3.5 अब्ज क्रोम वापरकर्ते; आत्ताच 'हा' एक बदल नाही केला तर डेटा होऊ शकतो गायब

8th Pay Commission : वेतनवाढीपूर्वीच कर्मचाऱ्यांना मोठा धक्का ! 'या' मुद्द्यावर सरकारने दिला स्पष्ट नकार

SCROLL FOR NEXT