esakal exclusive interview Indian person home quarantine in america 
कोल्हापूर

'घराशेजारी ७६६ जण कोरोनाग्रस्त; किड्यामुंग्याप्रमाणे लोक मरत आहेत'

गणेश शिंदे

जयसिंगपूर (कोल्हापूर) : अमेरिकेत कोरोनाने थैमान घातले आहे. आज प्रत्येक जण भितीखाली आहे. २७ दिवसांपासून घरात राहूनच स्वत:सह कुटुंबाचे संरक्षण करत आहे. भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाने वेळीच तीन आठवड्यांचा लॉकडाऊन जाहीर केल्याने आज सुरक्षित देश म्हणून अमेरिका भारताकडे पाहत आहे. केवळ दुर्लक्ष आणि बेफिकीरीमुळे अमेरिका आज कोरोनाच्या दृष्टचक्रात अडकत चालली आहे. शेजारील ७६६ जणांना कोरोनाची लागण झाली असून सध्या भितीच्या छायेतच दिवस काढत असल्याचे, अमेरिकेतील मेमफीस शहरातील अनिवासी भारतीय असणारे संभाजी पाटील यांनी ‘सकाळ'शी बोलताना सांगितले. 


संभाजी राजाराम पाटील मुळचे रेंदाळ (ता. हातकणंगले) गावचे तर त्यांच्या पत्नी सुवर्णा या शिरोळमधील पद्माराजे विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक गुलाबराव पाटील यांची कन्या व माजी आमदार उल्हास पाटील यांची पुतणी. संभाजी, पत्नी सुवर्णा आणि कन्या सिया यांच्यासह गेल्या साडेपाच वर्षापासून अमेरिकेत नोकरीच्या निमित्ताने स्थायिक आहेत. टेन्सी राज्यातील फेडिक्स हेडक्वॉटर कंपनीते ते अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. संभाजी पाटील म्हणाले, १३ मार्चपासून ‘वर्क अ‍ॅट होम' सुरु आहे. घरातच कार्यालय सुरु केले आहे. शिवाय बाहेर पडणे धोक्याचे असल्याने घरातच दररोजचा व्यायाम सुरु आहे. सुरुवातीच्या काळात कोरोनाचे गांभीर्य लोकांच्या लक्षात आले नाही. नंतर मात्र परिस्थिती हाताबाहेर गेल्याने प्रशासन हतबल झाले. माझ्या शेजारील ७६६ लोकांना कोरोनाची लागण झाल्याने मोठी घबराट निर्माण झाली आहे. भारतात मात्र सुरुवातीपासूनच लॉकडाऊन केल्याने परिस्थिती आजही नियंत्रणात आहे. किड्यामुंग्याप्रमाणे लोक कारोनामुळे मृत्युमुखी पडत आहेत. यंत्रणेमार्फत शेवटचे विधी उरकले जात आहेत. 

आता मात्र लोक स्वत:हून तपासणीसाठी जात असल्याने कोरोनाची संख्या वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या प्रचंड दहशतीखाली अमेरिकेतील नागरीक असून देशावर प्रथमच इतके मोठे संकट ओढावले आहे. भारताने वेळीच लॉकडाऊन केल्याने सावरण्याचा प्रयत्न केला असून नागरिकांनी घरातच राहून कोरोनाला हद्दपार करावे असे आवाहनही संभाजी पाटील व सुवर्णा पाटील यांनी केले आहे. 


ऑनलाईन शॉपींगही तीन दिवस दारात 

नागरिकांकडून ऑनलाईन शॉपींग केली जात आहे. आलेल्या वस्तूही तीन-तीन दिवस दारात पडून रहात आहेत. त्यानंतर वस्तू घरात घेऊन निर्जंतूकीकरण करुन वापरात आणल्या जात आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bangladesh Crisis: बांगलादेश पेटला! युवा नेत्याच्या हत्येनंतर राजधानीत आग, वर्तमानपत्रांची कार्यालये जळाली; देश अराजकतेच्या उंबरठ्यावर

Karad News : सोमनाथ भोसलेंनी साकारलेली ११ फुटी हनुमानाची मूर्ती लवकरच ऑस्‍ट्रेलियाला होणार रवाना

Ajwain Water at Night: वजन, पचन आणि पोटाची चरबी! दररोज 21 दिवस ओव्याचे पाणी प्यायल्यास शरीरात होतात 'हे' बदल

Prithviraj Chavan on Epstein files : ‘मराठी माणूस पंतप्रधान होणार’ यावर पुन्हा पृथ्वीराज चव्हाणांनी केलं वक्तव्य, फुसका बार की मराठी पंतप्रधान?

Pusegaon Rath Yatra : साताऱ्यातील पुसेगावात सेवागिरी रथावर तब्बल ८७ लाखांची देणगी भाविकांकडून अर्पण; परदेशी चलनाचाही समावेश

SCROLL FOR NEXT