Eventually the injured bear recovered and went into the forest 
कोल्हापूर

अखेर जखमी अस्वल तंदुरूस्त होवून गेले जंगलात 

शिवाजी यादव

कोल्हापूर : चंदगड तालुक्‍यातील एका गावात अस्वलाने म्हशीवर हल्ला केला, त्यावेळी प्रतिकार म्हणून म्हशींनी अस्वलावर हल्ला केला. यात अस्वल गंभीर जखमी झाले. विक्षिप्त असलेल्या अस्वलाला सुरक्षित पकडणे व ते शुद्धीवर असताना त्याला हाताळणे जोखमीचे असते. अशाही स्थितीत वन विभागाच्या उपचार व संक्रमण केंद्रातील डॉ. संतोष वाळवेकर यांनी अस्वलावर यशस्वी शस्त्रक्रिया केली  आणि त्याला मूळ अधिवासात सुरक्षित सोडले आहे. 
गेल्या महिन्यात चंदगडमधील एका गावात अस्वल जंगलाबाहेर आले. येत असतानाच त्या अस्वलाने म्हशींवर हल्ला केला. झटापटीवेळी म्हशीचा पाय अस्वलाच्या पायावर पडला. अस्वल गंभीर जखमी झाले. त्याच्या हालचाली क्षीण झाल्या. त्यानंतर येथे पिंजरा लावला. याच वेळी अस्वल जखमी झाल्याची माहिती उपचार केंद्राला मिळताच डॉ. वाळवेकर पथकासह चंदगड येथे गेले. त्या अस्वलाच्या पायाची जखम धुण्यात आली. त्यावर विविध मलम लावली. पायाचे मोडलेले हाड जुळविण्यासाठी शस्त्रक्रियाही केली. सलग चार दिवस उपचार केले. पायाची जखम बरी केली. अस्वलाच्या हालचाली पूर्ववत झाल्यानंतर त्याला जंगली भागात सोडले. पुढे काही दिवस त्याच्यावर लक्ष ठेवले. अस्वल बरे झाले असून जंगल अधिवासात त्याच्या हालचाली पूर्ववत सुरू आहेत, अशी माहिती डॉ. वाळवेकर यांनी दिली. 

गवे केले सुरक्षित मार्गस्थ 
वर्षभरात जिल्ह्यातील 16 ठिकाणी गवे नागरी वस्तीकडे आले. चार वेळा गवे कोल्हापूर शहरानजीक आहे. अशा गव्यांना सुरक्षितरीत्या जंगलाकडे जाण्याचा मार्ग काढून देण्यासाठी या केंद्राच्या पथकानेही सहभाग घेतला. गवा वजनाने जास्त व धिप्पाड असतो. यात धावपळ झाल्यास हृदयविकाराने गव्याचा मृत्यू होऊ शकतो. अशी वेळ येऊ नये, यासाठी गवे परतविण्याच्या मोहिमेत डॉ. वाळवेकर यांनी सहभाग घेतला. गव्यांच्या हालचाली, शारीरिक तंदुरुस्ती यानुसार त्यांना कोणताही धोका न पोहचवता दोन महामार्ग, तीन राज्य मार्ग ओलांडून गव्यांना जंगलाकडे पाठविण्यात यश आल्याचा अनुभवही डॉ. वाळवेकर यांनी सांगितला. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW: टीम इंडियाच्या नारी शक्तीचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाचा वन डे क्रिकेट इतिहासात असा पराभव कुणी केलाच नव्हता...

Archana Kute: 'ज्ञानराधा मल्टिस्टेट'च्या अर्चना कुटेंना पुण्यातून अटक; छाप्यात काय-काय सापडलं?

Nude Party: न्यूड पार्टीचे फोटो सोशल मीडियात व्हायरल; संशयित आयोजकांना अटक

PAK vs UAE Live: बिचारे... PCB ने खेळाडूंना तोंडावर पाडले, बॅगा घेऊन स्टेडियमवर पोहोचले; मॅच रेफरी Andy Pycroft च राहिले, टॉसही हरले

Latest Marathi News Updates: कन्नडच्या एसडीएम कार्यालयासमोर कोळी समाजाचे आमरण उपोषण

SCROLL FOR NEXT