कोल्हापूर

कोल्हापूर - माजी महापौरांचे थेट महापालिकेच्या दारातच अभ्यंगस्नान

माजी महापौर सुनील कदम यानी थेट पाईपलाईनचे पाणी मिळाले नसल्याने पंचगंगेच्या पाण्याने अभंग स्नान केले.

डॅनियल काळे

माजी महापौर सुनील कदम यानी थेट पाईपलाईनचे पाणी मिळाले नसल्याने पंचगंगेच्या पाण्याने अभंग स्नान केले.

कोल्हापूर : पालकमंत्री सतेज पाटील यांनी अनेकदा आश्वासने देऊनही दिवाळीचे अभ्यंगस्नान थेट पाईपलाईनच्या पाण्याने न करता आल्याने माजी महापौर सुनील कदम यांनी महापालिकेच्या दारात पंचगंगा नदीचे बादलीतून आणलेल्या पाण्याने दिवाळीचे अभ्यंगस्नान केले. यावेळी ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम यांच्यासह भाजप ताराराणी आघाडीचे अनेक माजी नगरसेवक उपस्थित होते.

कोल्हापूर शहराला काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईनने पाणी आमच्या योजनेचे काम गेल्या सात वर्षापासून सुरू आहे. यंदाच्या वर्षी हे काम पूर्ण होईल आणि दिवाळीच्या अभ्यंग स्नान थेट पाईप लाईनच्या पाण्याने होईल, असे आश्वासन पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले होते. पण यंदाच्या वर्षी हे काम पुर्ण झाले नाही. याची आठवण करून देत माजी महापौर सुनील कदम यानी थेट पाईपलाईनचे पाणी मिळाले नसल्याने पंचगंगेच्या पाण्याने अभंग स्नान केले. यावेळी भाजपचे अजित ठाणेकर, विजय सूर्यवंशी, आशिष ढवळे, वैभव माने, राजसिह शेळके, किरण नकाते आदी उपस्थित होते.

पालकमंत्र्याचा बार फुसका

सुनिल कदम म्हणाले, २०१४ पासून पालकमंत्री सतेज पाटील हे कोल्हापूरच्या जनतेला फसवत आहेत. यंदाच्या वर्षी हे काम पूर्ण होईल, आणि दिवाळीचे अभ्यंगस्नान थेट पाईपलाईनच्या पाण्याने करता येइल, असे आश्‍वासन पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले होते. पण हे आश्‍वासन त्यांनी पाळले नाही. त्यामुळे पंचगंगेच्या पाण्याने मी हे स्‍नान करत आहे. कोल्हापूरच्या थेट पाईपलाईनच्या पाण्याचा प्रश्‍न निकालात काढावा, यासाठी आपण हे आंदोलन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT