Ex soldier exposes ration scam in kolhapur
Ex soldier exposes ration scam in kolhapur 
कोल्हापूर

माजी सैनिकाने उघड केला कोरोना काळातील रेशन घोटाळा

प्रकाश पाटील

गिरगांव (कोल्हापूर) - करवीर येथील एल. एस. पाटील रास्तभाव दुकानाचा परवाना निलंबित करून अनामत रक्कम जप्त करण्याचे आदेश आज पुरवठा विभागाने दिले. कोरोना काळात सरकारने दिलेले धान्य वाटप परस्पर हडप करत असल्याची तक्रार संभाजी ब्रिगेडच्या रेशन दक्षता समितीचे अध्यक्ष निवृत्ती कुरणे यांनी दिली होती. तर जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांनी पाठपुरावा केला होता. एकूणच प्रकरणाची चौकशी करून जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवीतके यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत.

या रेशन दुकानाबाबत अनेक तक्रारी होत्या. दुकानदारांकडून मयत, विवाहाने कमी, परगावी असणारे लाभार्थी तसेच रेशन कार्डवरील एकूण नावे आणि ऑनलाइन नावे यामध्ये तफावत आढळून येत होती. कोरोना काळात केंद्र सरकारकडून मिळालेल्या धान्याची मागणी करण्यासाठी गेलेल्या ग्राहकांना धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर आल्या होत्या. संभाजी ब्रिगेडने या तक्रारींची दखल घेत पुरवठा विभागाकडे चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार प्रत्यक्ष दुकानात भेट देऊन तपासणी केली असता दुकानांमध्ये अनधिकृतरित्या धान्याचे वाटप करणे, कोरोना काळातील धान्य वाटपाच्या पावत्यामध्ये खाडाखोड करणे, शिधा पत्रिकेतील नावे परस्पर वाढवणे अथवा कमी करणे यामध्ये तहसीलदार कार्यालयाला न कळवणे आशा गोष्टी प्रथमदर्शनी दिसून आल्या. त्यानंतर एकूणच प्रकरणाची गेल्या तीन ते चार महिन्यांपासून चौकशी सुरू होती.
या चौकशीनंतर या रेशन दुकानातून मयत, विवाहाने कमी व्यक्तींच्या बाबतीत त्यांचे नावे येणारे धान्य कुटुंबास न देता कमी धन्य वाटप करणे, परस्पर अनधिकृतपणे त्यांचे स्तरावर धान्य वाटपात फेरबदल करणे, लाभार्थ्यांचे धान्य अवैधरित्या इतर लोकांना वाटणे, जानेवारी 2020 ते मे 2020च्या पावत्यामध्ये खाडाखोड करणे असा ठपका ठेवत अनामत रक्कम जप्त करून पुढील आदेशपर्यंत परवाना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. तर नागरिकांचे नुकसान होऊ नये म्हणून जवळच्या दुकानांत या दुकानातील ग्राहकांना जोडण्याचे या आदेशात म्हंटले आहे.


 गेल्या दहा वर्षाची चौकशी करून परवाना कायमचा रद्द करा. कोरोनाच्या काळात नागरिकांना मूठभर धन्यासाठी झगडावे लागत होते. मात्र निर्दयी दुकानदाराकडून त्यांचे धान्य हडपण्याचा गंभीर प्रकार होत होता. हा केवळ या काळातील प्रकार नसून या आगोदरसुद्धा मोठी लूटमार झाली आहे. त्यामुळे एकूणच सर्व प्रकरणाची चौकशी करून परवाना कायमचा रद्द करण्याची गरज आहे.

- रुपेश पाटील,जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड.

गावातील रेशन बचाव समितीकडून तक्रार आली होती. त्यानुसार कारवाई करून संबधीत दुकानाचा परवाना रद्द केला आहे. आशा एकून 69 दुकानावर कारवाई केली आहे.
-दत्तात्रय कवितके. जिल्हा पुरवठा अधिकारी.

गिरगावमध्ये माजी सैनिकांची संख्या जास्त आहे. लाॅकडाऊन काळात सर्वांनाच काम नसल्याने मी स्वत: रेशन दुकानात धान्य मागण्यासाठी गेलो. त्यावेळी मला संबंधिक दुकानदाराने माजी सैनिकांचे धान्य बंद झाल्याचे सांगितले. त्यावेळी मी पूर्ण चोकशी करून संबंधित दुकानावर कारवाईसाठी हालचाली केल्या आणि त्याला यश आले.

-निवृत्ती कुरणे, माजी सैनिक 

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT