Ex-soldier Tukaram Salokhe India-Pakistan War
Ex-soldier Tukaram Salokhe India-Pakistan War esakal
कोल्हापूर

पाकिस्तानविरुध्द तुंबळ युद्ध; पाच शहीद, 22 जवान जखमी.. माजी सैनिकानं सांगितला अंगावर काटा येणारा 1965 चा प्रसंग

संदीप खांडेकर

पाकिस्तानचे सैन्य आमच्या युद्धतंत्राने हादरले होते. आम्ही मागे हटणारे नव्हतो.

कोल्हापूर : ‘पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) १९६५ ला युद्ध सुरू झाले होते. फिरोजपूर मिलिटरी स्टेशनवरून (Firozpur Military Station) आम्ही शत्रूवर हल्ला करण्यासाठी बाहेर पडलो. आम्ही सहा सप्टेंबर १९६५ ला पहाटे सहा वाजता आंतरराष्ट्रीय सीमा पार करून पाकिस्तानमधील हडीयर गावावर हल्ला केला. ते ताब्यात घेतले.

आमच्यावर सात प्रतिहल्ले झाले. मरणाची भीती आम्हाला नव्हती. शरीर देशाला बहाल केल्याने आम्ही प्राणपणाने लढत होतो,’ शहाऐंशी वर्षीय माजी सैनिक तुकाराम गोविंद साळोखे युद्धातील आठवणींचा पट उलगडत होते.

साळोखे मूळचे गिरगावचे (ता. करवीर) सध्या ते रायगड कॉलनीत राहतात. ते कणेरीतील शाळेत सातवीपर्यंत शिकले. शाहू दयानंद हायस्कूलमधून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ते १७ एप्रिल १९५७ ला १९ मराठा लाईट इन्फंट्रीत दाखल झाले. वडील उत्पादन शुल्क खात्यात पोलिस होते.

मुलाने शिक्षक व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. साळोखे यांचा मात्र देशसेवेत जाण्याचा निर्णय पक्का होता. चीनविरुद्धच्या १९६२ च्या युद्धातही त्यांचा सहभाग होता. त्यांच्या १९६५ च्या युद्धाच्या आठवणी आजही ताज्या आहेत.

ते म्हणाले, ‘पाकिस्तानने हल्ला केल्यावर आम्ही फिरोजपूर मिलिटरी स्टेशनवर गेलो. तेथून हडीयरवर हल्ला करून ते गाव ताब्यात घेतले. पाकिस्तानचे सैन्य आमच्या युद्धतंत्राने हादरले होते. आम्ही मागे हटणारे नव्हतो. २० सप्टेंबरला पाकिस्तानी सैन्याविरूद्ध शर्थीची झुंज देत असताना पाच जवान शहीद, तर बावीस जखमी झाले. त्यानंतर तुंबळ युद्ध झाले आणि २३ सप्टेंबरला ते थांबले.

पुढे १९७१ च्या युद्धातही मी होतो. म्हणजे मी युद्धासाठी सज्ज होतो. तोवर युद्ध थांबले.’ सैन्यात भरती झाल्यानंतर तीन वर्षे नागालँडमध्ये होतो. कोहिमा, चकभामा, फूटझिरो, फेक, जुनोबटो, मोक्याकचूंब, दोहरट येथे माझी ड्युटी होती. फिझोने तेथे बंड केले होते. त्या परिसरात आम्ही गावकऱ्यांत देशाविषयी प्रेमाची भावना निर्माण करत होतो. मी २९ वर्षे १५ दिवस देशसेवेत होतो. त्यानंतर निवृत्त झालो आणि शेतीत लक्ष घातले.

सैन्यातील शिस्त...

सैन्यात असताना मी कधीच आजारी पडल्याचा अहवाल नाही. शिपाई, लास नाईक, नाईक, हवालदार, नायब सुभेदार, सुभेदार, सुभेदार मेजर, आॅनररी लेफ्‍टनंट, आॅनररी कॅप्टन पदावर मी काम केले. सैन्यातील शिस्त आजही पाळतो. दोन मुले असून, राजेंद्र मुंबई, तर संजय पुण्यात आहेत. वीस वर्षांपूर्वी पत्नीचे निधन झाले. गिरगावला शेती असून, कधी कधी गावात जातो, असे साळोखे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: Ram Naik: ९० वर्षांचे भाजप नेते राम नाईक यांनी बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 20 मे 2024

IPL 2024: अखेर साखळी फेरीची सांगता झाली अन् दुसऱ्या क्रमांकाची रस्सीखेच हैदराबादानं जिंकली

SCROLL FOR NEXT