Examination Of 86 Thousand People In Four Days Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

गडहिंग्लज तालुक्‍यात चार दिवसांत 1 लाख 14 हजार लोकांची तपासणी

अजित माद्याळे

गडहिंग्लज : माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत शहरासह तालुक्‍यात तपासणी मोहीम वेगावली आहे. गावागावांत कर्मचाऱ्यांची पथके दारासमोर जाऊन घरात कोणी आजारी आहे का, अशी विचारणा करीत तपासणी केली जात आहे. चार दिवसांत तालुक्‍यातील 89 गावांतील 1 लाख 14 हजार 934 लोकांची तपासणी केली असून, त्यात सर्दी, ताप, डोकेदुखीच्या 340 रुग्णांचा आढळ झाला आहे. साठ वर्षांवरील इतर आजाराचे आठ हजार रुग्ण समोर आले आहेत. 

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम 15 सप्टेंबरपासून सुरू केली आहे. शहर आणि गावागावांत पथकांची स्थापना करून या मोहिमेंतर्गत तपासणी मोहीम गतीने सुरू आहे. तपासणी पथकात आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, प्राथमिक शिक्षक, मदतनीस, स्वयंसेवक, आरोग्यसेविका आदींचा समावेश आहे.

शहरात प्राथमिक शिक्षक आणि स्वयंसेवक आहेत. एका पथकाकडून कमीत कमी रोज 50 कुटुंबांची तपासणी करण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार चारच दिवसांत तालुक्‍यातील जवळपास निम्म्या लोकसंख्येची तपासणी केली आहे. तालुक्‍यातील 89 गावांत एक लाख 91 हजार 358 लोकसंख्या असून, त्यातील आजअखेर 1 लाख 14 हजार 934 जणांची तपासणी पूर्ण झाली आहे. 157 पथकातील 471 कर्मचारी ही मोहीम राबवत आहेत. तपासणी करणाऱ्यांना पीपीई किट, ऑक्‍सिमीटर, तापमापक गन, सॅनिटायझर, मास्क आदी सुरक्षिततेचे साहित्य दिले आहे. सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखी आदी रुग्णांचा आढळ झाल्यास तत्काळ त्यांना फिवर क्‍लिनिकमध्ये पाठवून उपचार केले जात आहेत. 

रोज ही पथके गावागावांत जाऊन घरात कोणी आजारी आहे काय, अशी विचारणा करीत नागरिकांना तपासणीसाठी पुढे येण्याचे आवाहन करीत आहेत. लक्षणे न लपविता माहिती देण्यासही सांगितले जात आहे. तसेच, कोरोनाग्रस्त, कोरोनामुक्त झालेल्यांसह साठ वर्षांवरील इतर आजारी लोकांना आरोग्य संदेशही दिला जात आहे. हलकर्णी, कडगाव, महागाव, मुंगूरवाडी, नूल, कानडेवाडी या सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत समाविष्ट गावे आणि लोकांची तपासणी केली जात असून, नागरिकांचा या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात येते. 

15 ते 18 सप्टेंबरअखेरची तपासणी 
- तपासणी झालेली कुटुंबे : 28,056 
- सर्व्हेक्षित लोकसंख्या : 114,934 

आढळलेले आजारी 
- "सारी'चे रुग्ण : 7 (तीव्र खोकला, दम लागणे) 
- "ईली'चे रुग्ण : 340 (सर्दी, ताप, डोकेदुखी, सौम्य खोकला) 
- को-मॉर्बिड रुग्ण : 8711 (बी. पी., शुगर, कॅन्सर, टी.बी., एचआयव्ही आदी आजारांचे 60 वर्षांवरील रुग्ण) 

संपादन - सचिन चराटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: कर्मा रिपीट्स... मनोज जरांगे खूप महागात पडेल, धनंजय मुंडेंनी दिला इशारा! CBI चौकशीची मागणी

Stray Dogs Case: महामार्ग आणि द्रुतगती महामार्गांवर भटके श्वान आणि प्राण्यांना प्रवेशबंदी! सर्वोच्च न्यायालयाचे राज्यांना आदेश

Dombivli Traffic: शहरातील कोंडी फुटणार! मोठागाव रेल्वे फाटकावरील प्रकल्पात मोठा बदल; काय असेल नवा प्लॅन?

Latest Marathi News Live Update : रत्नागिरीत 44 कोटीचा डांबर घोटाळा

"हा सिनेमा चालणार नाही" माहेरची साडी सिनेमा पाहिल्यावर दादा कोंडकेनी पुतण्याला घेतलेलं फैलावर ; म्हणाले..

SCROLL FOR NEXT