The examination department tightened the belt; Search for software for paper checking 
कोल्हापूर

परीक्षा विभागाने कंबर कसली ;  पेपर तपासणीसाठी सॉफ्टवेअरचा शोध 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासाठी परीक्षा विभागाने कंबर कसली आहे; मात्र अपुरे मनुष्यबळ, कोरोनाचे संकट आणि पेपर तपासणाऱ्या सॉफ्टवेअरचा शोध अशी अनेक आव्हाने परीक्षा विभागासमोर आहेत. 
परीक्षा घेताना कोणती काळजी घ्यायची, याच्या मार्गदर्शक सूचना राज्य सरकारकडून आल्या आहेत. 
प्रश्‍नपत्रिका तयार करणे, ऑनलाईनसाठी तांत्रिक बाबींची पूर्तता करणे, वेळापत्रक निश्‍चिती या कामांना वेग आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर विद्यापीठांना अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे बंधनकारक झाले. विद्या परिषदेच्या बैठकीत ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय झाला. 1 ऑक्‍टोबरपासून लेखी परीक्षा तर 15 सप्टेंबरपासून प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहेत; मात्र यासाठी परीक्षा विभागाची चांगलीच तारांबळ उडाली आहे. मुळात परीक्षा विभागात मंजूर 117 पदांपैकी 47 पदे रिक्त असल्याने 70 कर्मचारीच कार्यरत आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाच्या कर्मचारी उपस्थिती अटीमुळे रोज 30 ते 40 कर्मचारीच उपस्थित असतात. एरवी परीक्षांचा कार्यक्रम 60 दिवसांचा असतो; मात्र आता केवळ 22 दिवसांत याची अंमलबजावणी करावी लागणार आहे. 

अतिरिक्त मनुष्यबळ घेणार 
कुलसचिव आणि कुलगुरूंकडून परीक्षा विभागाला अतिरिक्त मनुष्यबळ देण्यासंबंधी काम सुरू असून लवकरच त्यांना जादा मनुष्यबळ मिळण्याची चिन्हे आहेत. परीक्षेसाठी लागणाऱ्या प्रश्‍नपत्रिका बनवण्यासाठी प्राध्यापकांना प्रश्‍नसंच बनवण्यास सांगण्यात आले आहे. अधिष्ठाता मंडळ आणि अभ्यास मंडळातील सदस्य समितीच्या मार्गदर्शनाखाली प्रश्‍नपत्रिका बनवण्यात येतील. प्रश्‍नपत्रिका तपासून देणाऱ्या सॉफ्टवेअरचा शोध सुरू असून शासन हे सॉफ्टवेअर घेऊन देण्याची चिन्हे आहेत. 
 

परीक्षा ऑनलाईन होणार असल्याने अंतिम वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जाऊन आपले मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी यांची नोंद करावी. क्रमांक अथवा ई-मेल बदलले असतील तर त्यांची नव्याने नोंद करणे आवश्‍यक आहे. 
- गजानन पळसे, परीक्षा संचालक 

शासनाच्या मार्गदर्शक सूचना 
* विद्यार्थ्यांच्या आरोग्याला सर्वाधिक प्राधान्य द्यावे 
* परीक्षा घेताना विद्यार्थिहिताचा विचार व्हावा 
* तंत्रज्ञानाचा सर्वाधिक विचार व्हावा 
* 15 सप्टेंबरला प्रात्यक्षिक 
* 1 ऑक्‍टोबरला लेखी परीक्षा 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

Latest Marathi News Updates: धुळे जिल्ह्यातील देशशिरवाडे येथे १.५ टन गोमांस जप्त

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

SCROLL FOR NEXT