the excise department opened liquor stores in the karnataka state 
कोल्हापूर

अबब... एका दिवसात रिचविले 1 लाख 65 हजार लिटर मद्य...

सकाळवृत्तसेवा

बेळगाव - राज्यभरात काल एका दिवसात तब्बल 45 कोटी रुपयांच्या मद्याची विक्री झाली आहे. तर बेळगाव देखील हा आकडा वाढता असून तळीरामानी 1 लाख 30 हजार लिटर विविध प्रकाराचे मद्य आणि 35 हजार लिटर बिअर असे एकून 1 लाख 65 हजार लिटर मद्य रिचविले आहे. यापुढेही मंगळवार (ता.6) पासून सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत मद्यदुकाने कायम सुरु राहणार आहेत.

लॉकडाउनच्या 41 व्या दिवशी अबकारी खात्याने राज्यातील मद्याची दुकाने सुरु केली. मद्याविना तळीरामांचे घसे कोरडे पडले होते. ते ओले करुन घेण्यासाठी काल पहाटेपासूनच मद्यप्रेमींनी दुकानासमोर रांगा लावल्या होत्या. दुकानासमोर गर्दी होउ नये, तसेच सामाजिक अंतर राखता यावे. यासाठी बॅरिकेड्‌स उभारण्यात आले आहेत. दुकाने सकाळी 9 सुरु होताच अनेकांना मोठ्या प्रमाणात दारु साठा खेरेदी केली. एका व्यक्‍तील 2.3 लिटर व्हिस्की, रम, स्कॉच इतर प्रकारची आणि 18 बिअर खरेदी करण्याची मुभा देण्यात आली होती. त्यामुळे त्यापैक्षाही अधीक मद्याची मागणी करण्यात येत होती. पण, सर्वांनी मद्य मिळावे. यासाठी दुकानदार सर्वांना पुरेल इतक्‍याच मद्याची विक्री करीत होते.

निर्बंधीत क्षेत्रातील दुकाने वगळता इतर ठिकाणी सीएल 2 आणि सीएल 11 (एमएसआयएल) दुकानासमोर मद्यप्रमेंची तोबा गर्दी केली होती. दुकानमध्ये उपलब्ध असलेल्या मद्याची विक्री करण्यात येत होती. त्यामुळे दुपारनंतर बहुतांश दुकानातील साठा संपला होता. जे मद्य मिळेल ते घेउन मद्यपींना माघारी फिरने पसंत केले. सायंकाळी सहानंतर दुकाने बंद करण्यात आली. आज पहाटे एपीएमसी येथील केएसबीसीएल डेपोतून मद्याचा दुकानाना मद्याचा साठा पुरवठा करण्यात आला. या सर्व घडामोडीवर अबकारी अधिकारी बारीक नजर ठेवून होते. बेळगाव जिल्ह्यात मद्यपींना एका दिवसाप बिअर, रम, स्कॉच व इतर प्रकारे मद्य आणि बिअर असा एकून 1 लाख 65 हजार लिटर मद्य रिचवल्याची नोंद अबकारीकडे झाली आहे. तालुक्‍यातील बेळगुंदी, कॅम्प आणि येळ्ळूर येथील निर्बंधीत क्षेत्र उठविण्यात आले आहे. त्यामुळे आनखी काही मद्यदुकाने सुरु होण्याची शक्‍यता आहे.


काल एका दिवसात जिल्ह्यात 1 लाख 65 हजार लिटर मद्याची विक्री झाली आहे. आजपासून दुकानाना सर्व प्रकारचे मद्य पुरविले जाणार असून दररोज सायंकाळी सात पर्यंत मद्यदुकाने सुरु राहतील.
बसवराज - अबकारी उपायुक्‍त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sydney Beach Shooting : किंकाळ्या अन् जीव वाचवण्याची धडपड! सिडनीतील गोळीबाराचा थरकाप उडवणारा VIDEO समोर...

"मी त्यांना सांगितलं बारा तासांच्या वर.." कामाच्या वेळेबाबत जेव्हा मयुरीने घेतला ठाम निर्णय, म्हणाली..

Dhurandhar Video : 'धुरंधर' 300 कोटी पार! पण रहमान डकैतच्या रोलमध्ये शाहरुख खान असता तर...व्हायरल AI व्हिडिओ पाहून चाहते शॉक

Latest Marathi News Live Update: सोलापुरच्या बेडर पूल-नानीपार्क रस्त्याची भयानक दुरावस्था

Mumbai News: जळीत रुग्णांसाठी केईएमचा मोठा आरोग्यविषयक टप्पा! नवीन उपचार केंद्राचे लोकार्पण; काय सुविधा मिळणार?

SCROLL FOR NEXT