tiger ajara forest sakal
कोल्हापूर

कोल्हापूर : आजरा परिसरात वाघाचे अस्तित्व

जंगल समृद्धीची निशाणी; व्याघ्र गणना अंतिम टप्प्यात

सकाळ वृत्तसेवा

आजरा : अखिल भारतीय व्याघ्र गणना (All India Tiger Count)अंतिम टप्प्यात असून या प्रगणनेत आजरा तालुक्याच्या जंगल (ajara forest)परिसरात वाघाच्या अस्तित्वाच्या खुणा मिळाल्या आहेत. याबाबत वनविभागाकडून खात्रीलायक वृत्त आहे. वाघ हा अन्नसाखळीतील सर्वोच्च स्थान असलेला प्राणी आहे. त्याच्या वावराने तालुक्यातील जैवविविधता व जैवसाखळी समृद्ध असल्याची निशानी मिळाली आहे.

आजरा तालुक्यात सुमारे १७ हजार हेक्टरांत जंगल पसरलेले आहे. स्थानिक प्रजातीची झाडे, झुडपे व वेलीसह दुर्मिळ औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणात आहेत. हा तालुका औषधी वनस्पतीचे आगर म्हणून ओळखला जातो. आजरा तालुक्याचे जंगल हे आंबोलीला सलग्न आहे. जंगलात बिबटे, अस्वल, सांबर, भेकर, हत्तीसह विविध प्रकारचे प्राणी आहेत. सहा सात वर्षांपूर्वी तालुक्यात ब्लॅक पॅंथरचे (black panthor)अस्तित्वही मिळाले आहे. त्यामुळे हा जंगल भाग जैवविविधतने समृद्ध म्हणून ओळखला जात आहे.

शनिवारी (ता. १५) पासून व्याघ्र गणनेला सुरुवात झाली आहे. यात वाघ व तृण भक्षक प्राण्यांची गणना केली होती. यासाठी वनविभागाच्या १७ बिटमधील १७ पथके नेमली होती. पहिल्या तीन दिवसांत जंगल भ्रमंती केली. यापूर्वी आखलेल्या ट्रान्सेक्ट लाईनवर काम करण्यात आले. या लाईननुसार जंगलातील प्राण्यांच्या अस्तित्वाच्या विविध खुणा मिळतात, का याची पाहणी पथकाने केली. यात भेकर, सांबर यांनी झाडावर पाडलेले ओरखडे मिळाले. त्याचबरोबर वाघ व बिबट्याची विष्ठाही मिळाली आहे. गवे व हत्तीच्या पाऊलखुणा मिळाल्या आहेत. काही कर्मचाऱ्यांना बिबट्याचे(leopard) ओेरडणेही ऐकावयास मिळाले आहे. तालुक्यात वाघाचे(tiger) दर्शन अनेकदा झालेले आहे. तीन वर्षांत जंगल परिसरात बैलांना ठार करण्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे जंगल परिसरात वावर असल्याचे सांगितले जात होते.

ग्रामस्थांनी वावर टाळावा

मानव व वन्यजीवातील संघर्ष(conflict) टाळण्यासाठी जंगल परिसरातील ग्रामस्थांनी अवेळी जंगलात जाणे टाळावे. त्यामुळे वन्यजीवांचा वावर व त्यांच्या अधिवासावर मर्यादा येत असते. त्यामुळे जंगल भागात संचार करणे टाळावे, असेही वन्यजीव अभ्यासक, पर्यावरणप्रेमी व वनविभागाकडून (forest department )आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Theft : लॉकरचा पासवर्ड चोरला अन् १७ हजार डॉलर्सवर मारला डल्ला; पुण्यात ऑफिस बॉयचा कारनामा!

Weekend Special Recipe: वीकेंडला घरीच १५ मिनिटांत बनवा हॉटेल स्टाइल 'तंदूर पनीर टिक्का', सगळ्यांचं तोंडात पाणी सुटेल

आजचे राशिभविष्य - 10 जानेवारी 2026

Makar Sankranti 2026: मकर संक्रांतीला काळे कपडे का घातले जातात? कारण ऐकून थक्क व्हाल!

Panchang 10 January 2026: आजच्या दिवशी शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT