facilitator of the pistol case arrested 
कोल्हापूर

पाठलाग करून पकडला पिस्तूल प्रकरणाचा सूत्रधार 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - मार्केट यार्ड परिसरातून जप्त केलेल्या पिस्तूल प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला शाहूपुरी पोलिसांनी कणकवली येथे पाठलाग करून जेरबंद केले. समीर सलीम मेस्त्री (वय 20, कलमठ, कणकवली) असे त्या संशयिताचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती, शाहूपुरी पोलिसांनी मार्केट यार्ड येथे सापळा रचून संशयित अनिल तावडेला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पिस्तूल व जीवंत राऊंडही जप्त केला. तपासात त्याने हे पिस्तूल कणकवलीतून आणल्याचे सांगितले. या प्रकरणाचा खोलवर तपास करण्याच्या सूचना पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांनी दिल्या. त्यांच्या मार्गदर्शनानुसार सुहास पोवार, प्रशांत घोलप व दिग्विजय चौगले यांचे पथक गुरुवारी कणकवलीला गेले होते. पथकाला संशयिताचा सुगावा लागला. त्याला पकडण्यासाठी बाजारपेठेत सापळा लावला.

पोलिसांना पाहून त्याने पळ काढला. पोलिसांनी त्याचा थरारक पाठलाग करून ताब्यात घेतले. चौकशीत संशयिताने त्याचे नाव समीर मेस्त्री असल्याचे सांगून हे पिस्तूल आपणच दिल्याची कबुली दिली. त्याला कणकवली पोलिस ठाण्यात नेऊन तेथून शाहूपुरी पोलिस ठाण्यात आणून अटकेची कारवाई केली. पथकातील पोवार, घोलप व चौगले हे या कारवाईतील हिरो ठरले. 


संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmers Protest : चांदवडमध्ये कांद्याचा उद्रेक! ३००० रुपये हमीभावासाठी सोमवारपासून शेतकरी उपोषणाला बसणार

एका लग्नाची पुढची गोष्ट नाटकाला कविता मेढेकरांनी दिलेला नकार ! "माझा रोलच नसेल.."

Latest Marathi News Live Update : मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’बाबत मुख्यमंत्र्यांकडे मिलिंद नार्वेकरांची महत्त्वाची मागणी

Mumbai-Goa Highway : अखेर दिलासा! मुंबई-गोवा महामार्गावरील बावनदी पूल एका मार्गिकेवर खुला; खड्डेमुक्त प्रवासाला सुरुवात

Kasheli Tourism : कशेळी पर्यटकांच्या पसंतीस; पण सुविधांची वानवा; रस्ते, स्वच्छतागृहांसह सुरक्षारक्षकांची गरज, प्रशासनाच्या कार्यवाहीकडे लक्ष

SCROLL FOR NEXT