falling gold prices in kolhapur marathi news 
कोल्हापूर

सोन्याच्या दरात कमालीची घसरण जाणून घ्या कोल्हापूरातील दर...

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोरोनाच्या दहशतीचा फटका सराफ व्यापारालादेखील बसला असून सोन्याच्या भावात होणारी घसरण आज सुरूच राहिली. मल्टी कमॉडिटी एक्‍स्चेंजमध्ये आज सोन्याचा भाव ७०० रुपयांनी कमी झाला. तो ४१ हजार ९०० रुपयांपर्यंत खाली आला; तर चांदी एक हजार रुपयांनी स्वस्त झाली. 

गुंतवणूकदारांसाठी संधी

चांदीचा भाव प्रतिकिलो ४३ हजार १७९ रुपये झाला. गुरुवारी सोन्याच्या दरात ११०० रुपयांची घसरण झाली होती. चांदी १६०० रुपयांनी स्वस्त झाली होती. कोरोनाच्या भीतीमुळे आर्थिक अनिश्‍चिततेच्या पार्श्वभूमीवर सराफ बाजारात साठेबाजांनी सोन्याची जोरदार विक्री केली. ज्यामुळे या धातूंचे भाव गडगडले. सोमवारी सोने १७०० डॉलरवर गेले होते.

जगभरात कोरोनाने घातलेल्या धुमाकुळामुळे सर्वच देशांत जाणवत आहेत. शेअर बाजारातील घसरण आणि सोन्याच्या किमतीत झालेली घट ही गुंतवणूकदारांसाठी संधी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा- अन् चुडतीच्या प्रकाशात नवरा पोहोचला लग्न मंडपी... ​
शेअर बाजारावर परिणाम

कोरोनाच्या धास्तीमुळे गरज असल्याशिवाय खरेदी होत नाही आहे. गुंतवणूक कमी झाली आहे. या सर्व गोष्टींचा फटका व्यापाराला बसत असून शिवाय शेअर बाजारातील घसरणीचादेखील परिणाम दरावर झालेला आहे.
- अमोल ढणाल, अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा सराफ आणि सुवर्णकारसंघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT