Family budget cuts; Scissors on many items by price increase 
कोल्हापूर

कुटुंबाचे बजेट काटावरच ; दरवाढीने अनेक वस्तुंना कात्री

लुमाकांत नलवडे

कोल्हापूर : कुटुंबाच्या मासिक बजेटमध्ये अनेक वस्तूंना कात्री लागली आहे. केवळ अत्यावश्‍यक वस्तुंचाच महिन्याचा बाजार भरला जातो. परिणामी किराणा मालाचा व्यापार 40 टक्‍क्‍यांनी कमी झाला आहे. डिझेल दर वाढल्यामुळे प्रतिकिलो सुमारे दीड ते दोन रुपयांनी धान्य वाढले आहे, तर महिन्याला दहा रुपयांनी खाद्य तेलाचे दर वाढत आहेत. यातच पेट्रोल-डिझेलसह घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढल्यामुळे कुटुंबप्रमुखांसह गृहिणींना बचत, नवी खरेदी आदीला फाटा द्यावा लागत आहे. 


चौकोनी कुटुंबाचे मासिक बजेट : 
*मासिक किराणा (गॅस सिलिंडरसह) ः 5500 
*मोबाइल खर्च तिघांचा ः 900 
*केबल खर्च (सरासरी) ः 350 
*घरभाडे-किंवा हप्ता ः चार ते दहा हजार (सरासरी 6 हजार) 
*शालेय खर्च ः एक हजार 
*आजारपण-औषध ः एक हजार 
*प्रवास खर्च पेट्रोल-रिक्षा (कमीत कमी) ः 2000 
*भाजीपाला ः एक हजार रुपये 
*नॉनव्हेज किंवा फळे ः 800 रुपये 


उत्पन्नावर आधारित फॅमिलीचे बजेट : 
*सरकारी नोकरदार ः 30 हजार ते दीड लाखांपर्यंत 
*सर्वसमान्य खासगी नोकरदार ः 10 ते 25 हजार रुपयांपर्यंत 
*रिक्षाचालक ः मासिक उत्पन्न ः 9 हजार रुपये 
*गवंडी, सेंट्रिंग कामगार ः साधारण 20 हजार रुपये 
*भाजी विक्रेते, फेरीवाले ः सुटी न घेतल्यास दहा ते पंधरा हजार 
*खासगी दुकानातील कामगार ः सात ते आठ हजार रुपये 

डिझेल दरवाढीचा परिणाम 
डिझेल दर वाढण्यापूर्वी प्रत्येक क्विंटलला 225 ते 230 रुपयांचा वाहतूक खर्च होता. आता तो 280-300 पर्यंत वाढला आहे. यामुळे वाहतूक खर्च प्रतिकिलो 60-80 पैशांनी वाढला आहे. हीच वाहतूक किरकोळ विक्रेते आणि ग्राहकांपर्यंत पोचण्यासाठी प्रती किलो सुमारे दीड ते दोन रुपयांची वाढ होते. 

घरगुती गॅस सिलिंडरचे अनुदान बंद आहे, आणि दरही 830 रुपये आहे. 1 किलो तेलासाठी 150 ते 180 रुपये लागतात. पेट्रोलचे दर शंभरीत पोचल्यामुळे मुलांचा खर्च वाढला आहे. डाळी महाग झाल्या आहेत. यामुळे कुटुंबाचे मासिक बजेट मध्ये सुमारे दीड-दोन हजारांनी वाढले आहे. गहू वाढलेला नाही आणि भाजीपाला स्वस्त आहे. जीवनावश्‍यक इतर वस्तू महागल्यामुळे काटकसर करावी लागत आहे. 
- सविता ठोंबरे, गृहिणी. 

 
तेलाचे दर महिन्याला दहा रुपयांनी वाढत आहेत, आज शेंगतेल 180 रुपये किलो आहे. डाळीही वीस-बावीस रुपायांनी वाढल्या. कडधान्याचे दर किलोला दहा ते बारा रुपयांनी वाढले. सहा महिन्यांतील फरक पाहता एका कुटुंबाच्या मासिक बजेटमध्ये किमान हजार ते दीड हजारांनी वाढ झाली आहे. किरकोळ किराणामाल दुकानदारांचा व्यवसाय 40 टक्के कमी झाला आहे. 
- बबन महाजन, किराणा दुकानदार. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman: रशियन महिला सापडली ते गोकर्णचं घनदाट जंगल... माणूस हरवला की रस्ता ही सापडणार नाही, फोटो पाहा

रशियन महिलेच्या मुलींचे वडील कोण? भारतात का आली होती? मोठे अपडेट समोर

Latest Maharashtra News Updates : पंचगंगा नदीची पाणी पातळी चोवीस तासांत सहा फूट सहा इंचांनी वाढली

Local Elections 2025 : नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप, इच्छुकांचा अभ्यास, जिल्हा परिषद गट-गण प्रारूप रचना; निवडणूक मोर्चेबांधणीला सुरुवात

Kolhapur Chappal Prada : ‘प्राडा’ची टेक्निकल टीम कोल्हापुरी पायतान बघून भारावली, कारागिरांची हस्तकला पाहून म्हणाले...

SCROLL FOR NEXT