farmer jump in borewell
farmer jump in borewell 
कोल्हापूर

अन् त्याने अंगावरील कपडे काढून थेट कूपनलिकेतच घेतली उडी...

सकाळवृत्तसेवा

रायबाग (बेळगाव) - खोदाई केलेल्या कूपनलिकेला पाणी न लागल्याने शेतकऱ्याने त्याच ५०० फूट खोदाई केलेल्या कूपनलिकेत उडी घेतली. ही घटना आज (ता. ११) रायबाग तालुक्यातील सुलतानपूर येथे घडली. लकाप्पा दोडमनी (वय ३८) असे कर्जाच्या भीतीपोटी उडी घेतल्याने मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोमनहळ्ळी, जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबर्गी, तहसीलदार चंद्रकांत बजंत्री व अधिकाऱ्यांनी भेट दिली.

जेसीबीद्वारे कूपनलिकेच्या बाजूने खोदाई

या बाबत अधिक माहिती अशी, लकाप्पा दोडमनी यांची पाऊण एकर जमीन आहे. या जमिनीला पाणीपुरवठा करण्यासाठी कर्ज काढून गेल्या गुरुवारी (ता. ७) ५०० फूट खोल कूपनलिका खोदली आहे. मात्र तिला पाणी न लागल्याने चिंतेत असणाऱ्या लकाप्पा यांनी आज (ता. १२) सकाळी दहा वाजता अंगावरील कपडे काढून थेट कूपनलिकेत उडी घेतली. ही माहिती ग्रामस्थांना समजताच एकच गर्दी झाली. रायबागचे तहसीलदार चंद्रकांत बजंत्री, तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी प्रकाश वड्डर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस. एस. बाणे,अथणीचे पोलिस उपाधीक्षक एस. व्ही. गिरीश, मंडल पोलिस निरीक्षक के. एस. हट्टी, हारुगेरीचे पोलिस उपनिरीक्षक यमनाप्पा मांग यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. त्यांनी अग्निशामक दलासह  एसडीआरएफ टीमला पाचारण केले. तीन जेसीबीद्वारे कूपनलिकेच्या बाजूने खोदाई करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोमनहळ्ळी, जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबर्गी यांनीही सायंकाळी घटनास्थळी धाव घेतली. लकाप्पा वाचविण्यासाठी त्यांनी रेस्क्यू टीमसह अधिकाऱ्यांना सूचना केल्या. लकाप्पा हे कूपनलिकेत खालीपर्यंत गेलेले नव्हते. ते मध्यावर अडकले होते. त्यांच्यापर्यंत पोहोचून तात्काळ बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यांच्यापर्यंत पोहोचल्यावर मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत लकाप्पा यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोमनहळी यांनी, मयत लकाप्पा यांच्या कुटुंबीयांची आर्थिक स्थिती बिकट आहे. त्यामुळे शासनातर्फे जास्तीत जास्त मदत मिळवून देणार असल्याचे सांगितले.

वाचवण्यासाठी तीन तास प्रयत्न

'रेस्क्यू टीम'कडून कूपनलिकेतून लकाप्पा यांना बाहेर काढण्यासाठी दुपारी तीन ते सहापर्यंत तीन तास प्रयत्न झाले. पण आत जास्त वेळ गुदमरल्याने त्यांना मृत्यूने गाठले. शेतकऱ्याचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT