Farming at base nutritional value to 200 farming families
Farming at base nutritional value to 200 farming families 
कोल्हापूर

200 शेतकरी कुंटुंबांना आधार पोषण मूल्यावरील शेतीचा

नंदिनी नरेवाडी

कोल्हापूर : कुटुंबातील प्रत्येकाच्या आरोग्यासाठी पोषण मूल्ये पुरवणारी व भरघोस उत्पन्नही मिळवून देणारी पोषण मूल्यावर आधारित शेती फायद्याची ठरत आहे. श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्रातर्फे पोषण मूल्यावर आधारित शेती उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत शेंडूर (ता. कागल) येथील 200 शेतकरी कुटुंबीयांनी या उपक्रमात सहभाग घेतला आहे. 

एम. एस. स्वामीनाथन, युनिसेफ आणि एमसीएईआरतर्फे पोषण मूल्यावर आधारित शेतीसाठी कार्यक्रम ठरविला आहे. हाच उपक्रम सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्राने शेंडूर गावात राबविला. वीस गुंठे ते एक एकर जागेत मोठी परसबाग ज्यामध्ये वड, पिंपळ, औषधी वनस्पती, फळझाडे, फुलझाडे, वेलवर्गीय झाडे, कडधान्ये, तृणधान्ये, तेलबिया, पालेभाज्या, फळभाज्या आणि वेलवर्गीय भाज्यांची लागवड करता येते. कुटुंबाला वर्षभर पुरेल इतके धान्य, तेल आणि रोजचा भाजीपाला मिळू शकेल. कमी जागा उपलब्ध आहे त्यांच्यासाठी पाच गुंठे जागेत मध्यम स्वरूपाची, दीड गुंठे ते 5 गुंठे जागेत हंगामी भाजीपाला, फळभाज्यांचे उत्पादन घेता येते. 

दरम्यान, या शेतकऱ्यांना दररोज येणाऱ्या भाज्यांचे प्रमाण आणि त्याचे बाजारभावाप्रमाणे दर याची नोंद ठेवण्यासाठी एक नोंदवही दिली. नोंदवहीत त्यांनी एखादे रोप कधी लावले, त्यातून उत्पादन कधी मिळाले आणि दररोज साधारण किती प्रमाणात मिळाले, याची नोंद हे शेतकरी करत होते. वर्षभरानंतर ही नोंदवही तपासल्यानंतर चौपट उत्पादन मिळाल्याचे समोर आले. बाजारभावाप्रमाणे जे शेतकरी एका महिन्यात आठशे रुपयांची भाजी खरेदी करत होते. तेथे त्यांनी एका महिन्यात 14 हजार 200 रुपयांच्या भाजीपाल्याचे उत्पादन घेतले. हा भाजीपाला घरी वापरण्यासोबत विक्रीसही ठेवला. 

शेळी, गाय, म्हैस पालनसाठी प्रोत्साहन.. 
या शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीच्या प्रशिक्षणासोबतच कोंबडीपालन, शेळीपालन, गाय, म्हैस पालन यासाठीही प्रोत्साहन देईल. जेणेकरून अंडी, दूध यातूनही उत्पन्न मिळवता येईल. तसेच शेतकऱ्यांना शेतीसाठी बी-बियाणे, रोपे, सेंद्रिय खतेही पुरविली. 

फक्त नगदी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना पोषण मूल्यावर आधारित शेतीचे महत्त्व पटले. आता हे शेतकरी नगदी पिकांसोबतच ही शेती करण्यासाठीही पुढाकार घेत आहेत. उत्पन्नासोबतच आरोग्यासाठीही ही शेती फायदेशीर ठरते. यंदा त्यांनी स्वयंप्रेरणेनेच पोषण मूल्यावर आधारित शेतीसाठी काही जागा आरक्षित ठेवली आहे. 
- प्रतिभा ठोंबरे, विशेषज्ज्ञ, सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र 


संपादन : प्रफुल्ल सुतार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Country Cricket : भांडण बीसीसीआय अन् पीसीबीचं; तिकडं इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे ह्रदयाचे ठोके का वाढले?

Manifesto : केवळ घोषणा, अंमलबजावणी नाही! जाहीरनाम्यांपासून ज्येष्ठ नागरिक दूरच असल्याची खंत

MPSC Exam : लोकसेवा आयोगाचं शुद्धीपत्रक, राज्यसेवा पूर्व परीक्षेची नवीन तारीख जाहीर

Vimannagar Fire : विमाननगर येथे व्यवसायिक इमारतीतील सहाव्या मजल्यावरील कार्यालयाला आग

SRH vs LSG Live Score : संथ खेळपट्टीवर लखनौ सुस्तावली; अर्धशतकासाठी उजाडलं 9 वं षटक

SCROLL FOR NEXT