fastag update pune bangalore highway issue vehicle marathi news 
कोल्हापूर

FasTag Update: फास्टटॅग बंद करा अन्यथा  मनसे स्टाईलने आंदोलन; पुणे बंगळूर महामार्गावर राडा

सकाळ वृत्तसेवा

घुणकी (कोल्हापूर) :पुणे बंगळूर महामार्गावरील किणी (ता.हातकणंगले) पथकर नाक्यावरफास्टँगमुळे वाहनांची गर्दी झाल्याने पुण्याच्या माजी नगरसेवक व मनसेच्या कार्यकर्त्यां रुपाली पाटील यांनी मंगळवारी रात्री काही वेळ टोल फ्री केला.
 सोमवार पासून फास्टँगची सक्ती केली. ज्या वाहनांवर फास्टँग नाही. त्यांच्याकडून दुपट पैसे घेतल्याने वाद झाले आणि त्यातूनच वाहनांच्या रांगा लागल्या.मनसेच्या कार्यकर्त्यां रुपाली पाटील या कोल्हापूरला गेल्या होत्या. रात्री परताना  वाहनांची गर्दी झाल्याचे निदर्शनास आले.

" किणी टोलवरील फास्टँगच्या माध्यमातून सुरु असलेली लोकांची पिळवणूक थांबवा. नियमानुसार तीन मिनिटात वाहने जात नसल्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या. ७ किलोमीटरवर रांगा लागल्या आहेत. लोकांना सुविधा द्यायला आहात का मारायला ?
फास्टटॅग नाही म्हणून डबल पैसे का द्यायचे? डबल पैसे देणार नाही. पहिल्या रांगा बंद करा.फास्टटॅग करून वेळ वाचतच नाही. फास्टटॅग बंद करा अन्यथा  मनसे स्टाईलने आंदोलन करावे लागेल.असा इशारा अँड.पाटील यांनी देत काही वेळ वाहने फ्री सोडण्यास भाग पाडले. 

"नियोजन चांगले केले आहे. फास्टँगमुळे वाहने पंधरा सेंकदात जातात. पण ज्या वाहनांवर फास्टँग नाही. त्यांच्यामुळे वाहनांना उशीर होत आहे. त्यामुळे रांगा लागतात. 
टोल व्यवस्थापक प्रताप भोईटे यांनी सांगत अँड. पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तरीही सौ.पाटील यांनी काही वेळ टोल फ्रि करण्यास भाग पाडलेच.दरम्यान आज दुपारी पथकर नाक्यावर गर्दीचे प्रमाण कमी झालेले पहायला मिळाले.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक; सचिवांच्या तोंडाला काळे फासले, अध्यक्षांनाही इशारा

Kannad News: खिचडी खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडली; दोन चिमुकल्या भावा-बहिणींचा उपचारादरम्यान मृत्यू

Marbat Festival 2026: काळी मारबत, पिवळी मारबत… नागपूरचा ‘मारबत उत्सव’ नेमका काय आहे?

Latest Marathi News Live Update : MPSC सचिवांना काळं फासलं, संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका

Maratha Reservation: मनाेज जरांगे यांच्या उपोषणाचा १४वा दिवस; अभिजित दिपकेंचा सरकारवर निशाणा, ‘चर्चेसाठी पुढे या’

SCROLL FOR NEXT