Fasting on behalf of the Christian community 
कोल्हापूर

ख्रिस्त समाजातर्फे साखळी उपोषण 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - कोडोली (ता. पन्हाळा) येथील ख्रिस्ती समाजाची लोकोपयोगी मालमत्ता बोगस कागदपत्रांच्या आधारे हडप करण्याच्या हेतूने द इंडियन कॅनेडियन मिशनच्या नावावर करण्याचा आदेश करणाऱ्या पन्हाळा प्रांत अजय पवार, पन्हाळा भूमिअभिलेख अधीक्षक सुनील नाळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करून फौजदारी करावी, तसेच नोंदी रद्द करून मालमत्तेवर पुन्हा कोईमार ट्रस्ट आणि कोल्हापूर चर्च कौन्सिलची नावे लावावीत, या मागणीसाठी आजपासून ख्रिस्ती समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू केले. मागण्या मान्य न झाल्यास सामुदायिक आत्मदहनाचा इशारा दिला. 

कोडोली (ता. पन्हाळा) येथे ख्रिस्ती समाजाच्या शाळा, रुग्णालय, चर्च आहे. या मालमत्तेचा सातबारा उतारे नंबर, गटनंबर 1126, 589, 2615 असे होते. 1978 ला सातबारा रद्द करून प्रॉपर्टी कार्ड केले. त्याचा नंबर सि.स. 1890 आहे. प्रॉपर्डी कार्ड तयार झाल्याने सातबारा गटनंबर रद्द होणे आवश्‍यक आहे; परंतु महसूल विभागातील तलाठी, मंडल अधिकारी, पन्हाळा तहसीलदारांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. सातबारा रद्द केले नसल्याने याचा गैरफायदा घेऊन इंडियन कॅनेडियन मिशन असल्याचे भासवून दीपक गायकवाड यांच्यासह अन्य कांहींनी मिळकतीवर नाव लावले. याप्रकरणी महसूल विभागानेच संबंधितांवर फौजदारी करावी, मालमत्तेवरील चुकीच्या नोंदी रद्द करून मालकी पूर्ववत कोईमार ट्रस्ट व कोल्हापूर चर्च कौन्सिलकडे द्यावी, अशी मागणी आहे. 

रेव्हरंड रमेश मोहिते, सेक्रेटरी जे. ए. हिरवे, उदय विजापूरकर, एस. आर. रणभिसे, शमुवेल गायकवाड, डॉ. प्रशांत जमने, दीनानाथ कदम, संदीप थोरात, अजित आढाव, प्रवीण महापुरे, आशुतोष आवळे, सचिन समुद्रे, बी. जी. मोरे, दत्ता महापुरे, शारदा चोपडे, माया गायकवाड उपस्थित होते. 

तात्काळ चौकशीचे आदेश 
ख्रिस्ती समाजाच्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी भेट घेऊन चर्चा केली. याप्रकरणी तात्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले असून दोन आठवड्यावर दोषींवर कारवाई केली जाईल,असे आश्‍वासन शिष्टमंडळाला दिले. 

 
इंडियन कॅनेडियन प्रेसबिटेरियन मिशनची बदनामी करण्यासाठी खोट्या तक्रारी करून तसेच समाजात तेढ निर्माण करून मला व माझ्या कुटूंबियाच्या जीवास धोका निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. 
- दीपक गायकवाड, इंडियन कॅनेडियन प्रेसबिटेरियन मिशन 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Latest Marathi News Updates : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडले झुरळ

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मराठी नाट्य परिषदेतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन; कुठे कराल अर्ज? वाचा नियम व अटी

API Duty: आता उपचार स्वस्त होणार! औषधांच्या किमतीबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, कुणाला फायदा?

SCROLL FOR NEXT