father killed son in belgaum 
कोल्हापूर

डोक्यात दगड घालून वडिलांनीच केला मुलाचा खून

सकाळ वृत्तसेवा

रायबाग : डोक्यात दगड आणि कुराडीने घाव घालून वडिलाने मुलाचा निर्दयीपणे खून केला. पैसे आणि सोन्याच्या वादातून रायबाग तालुक्यातील खणदाळ येथे बुधवारी (ता. ७) पहाटे ४ वाजता ही घटना घडली. आलगोंडा चन्नाप्पा अजुरे (वय ४०) असे मयताचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी चन्नाप्पा अजुरे (वय ८०) यास अटक केली आहे. 

हारूगेरी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.
 याबाबत अधिक माहिती अशी, खणदाळ येथील चन्नाप्पा अजुरे यांना आलगोंडा व सदाशिव असे दोन मुले होती. त्यांची घरची सहा एकर जमीन आहे. चन्नाप्पाने दोघा मुलांना प्रत्येकी तीन एकराप्रमाणे जमीन वाटणी करून दिली होती. चन्नाप्पा हा दुसरा मुलगा सदाशिव याच्याकडे वास्तव्यास होता. चन्नाप्पाकडे रक्कम व दागिने होते. त्याचीही वाटणी करण्याची मागणी आलगोंडा याने केली होती. त्यावरून बऱ्याच दिवसांपासून वाद सुरू होता. पाच दिवसांपूर्वी त्यावरून भांडणही झाले होते. तेंव्हापासून चन्नाप्पा हा आलगोंडाच्या मागावर होता. मंगळवारी रात्री तो घरी झोपला असता पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास डोक्यात दगड घातला. तसेच आरडाआेरडा करताच कुराडीने घाव घातले. त्यातच आलगोडा हा ठार झाला. सकाळी खूनाची घटना घडल्याचे उघडकीस आले.

 याबाबतची माहिती मिळताच हारूगेरी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक यमनाप्पा मांग, हनमंत अंबी, परमेश्वर गु़डरगी, पी. के. डोणी, आर. पी. कटेकर व सहकाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. आरोपी चन्नाप्पाला पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास सुरू आहे. मयत आलगोंडा याच्या मागे दोन पत्नी, चार मुलगे असा परिवार आहे.


संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT