father in law attack on son in law khanapur crime case belgaum 
कोल्हापूर

धक्कादायक! बापानचं पुसलं लेकीचं कुंकू, तलवारीनं वार करत जावायाला संपवलं

सकाळ वृत्तसेवा

खानापूर (बेळगाव) : कौटुंबिक वादातून सासऱ्याने जावयाचा तलवारीने हल्ला करून खून केल्याची घटना तालुक्यातील कक्केरी येथे सोमवारी (ता.30) रात्री उशिरा घडली. बिष्टाप्पा कोनसकोप्प (वय 43) असे मयताचे नाव असून हल्लेखोर सासरा फरारी आहे. 


याबाबत घटनास्थळ आणि पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी,

सोमवारी रात्री बिष्टाप्पा यांच्या शेतात भाताची मळणी सुरू असताना सासरा-जावयाचे भांडण झाले. भांडणाचे रूपांतर मारामारीत झाले. दरम्यान , सासऱ्याने जवयावर तलवारीने हल्ला केला. यात बिष्टाप्पा यांच्या डोक्याला वर्मी घाव बसून ते जागीच गतप्राण झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नंदगड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन सकाळी पंचनामा केला.

हल्लेखोर सासरा फरारी झाला आहे. या हल्ल्यात आणखी कुणाचा सहभाग आहे याची माहिती घेतली जात आहे. या घटनेने कक्केरी परिसरात खळबळ उडाली आहे.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, १४ जिल्ह्यांत जोरदार बरसणार; ४८ तास धोक्याचे

Latest Marathi News Updates: पाकिस्तानच्या ग्रुपवर चॅट करण्याचं प्रकरण, नागपूरमधील दोघांची एटीएसकडून चौकशी

Explained: दूध प्यायल्याने लठ्ठपणा वाढतो का? जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात

Pune Theatre Festival : नाट्यप्रेमींसाठी तीन दर्जेदार नाटकांची पर्वणी; ‘सकाळ’तर्फे येत्या आठवड्यात नाट्य महोत्सवाचे आयोजन

Gondia News: देवरी एमआयडीसीतील सुफलाम कंपनीत भीषण अपघात; मशीनमध्ये अडकून मजुराचा होरपळून मृत्यू

SCROLL FOR NEXT