Fear of who will be appointed as the administrator of Belgaum Municipal Corporation 
कोल्हापूर

कोरोनापेक्षा बेळगाव महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना आहे यांची धास्ती..

सकाळवृत्तसेवा

बेळगाव - कोरोनापेक्षा महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना भलतीच धास्ती लागली आहे. 1 जुलै पासून बेळगाव महापालिकेचे प्रशासक म्हणून कोणाची नियुक्‍ती होणार याची धास्ती त्यांना आहे. सध्या जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोमनहळ्ळी हे महापालिकेचे प्रशासक आहेत. पण ते 30 जून रोजी निवृत्त होणार आहेत. त्यांच्या निवृत्तीमुळे महापालिकेत नव्या प्रशासकांची नियुक्ती होणार आहे. प्रादेशिक आयुक्त आमलान बिश्‍वास याना पुन्हा पालिका प्रशासक म्हणून नियुक्त केले जाण्याची शक्‍यता आहे. पण बिश्‍वास यांची प्रशासक म्हणून नियुक्ती होवू नये यासाठी महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यानी देव पाण्यात घातले आहेत.

लोकनियुक्त सभागृह नसल्यामुळे 15 मार्च 2019 पासून बेळगाव महापालिकेवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत. महापालिकेतील लोकनियुक्त सभागृहाचा कार्यकाळ संपला की तेथे संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली जात होती. पण 2019 साली राज्यशासनाने थेट प्रादेशिक आयुक्तांचीच प्रशासक म्हणून नियुक्ती केली. शासनाच्या या निर्णयाची त्यावेळी जोरदार चर्चाही झाली होती. प्रारंभी तुषार गिरीनाथ, त्यानंतर दीपा चोळण व पी. ए. मेघण्णावर यानी महापालिका प्रशासक म्हणून कामकाज केले. मेघण्णावर यांच्या निवृत्तीनंतर आमलान बिश्‍वास यांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाली. बिश्‍वास यानी सुमारे सहा महिने प्रशासक म्हणून कामकाज केले, पण या सहा महिन्यात पालिकेच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना सळो की पळो करून सोडले. महापालिकेत वारंवार आढावा बैठक घेवून पालिकेच्या कामकाजाचा पंचनामाच केला. स्मार्ट सिटी योजनेच्या कामांवरही त्यानी सातत्याने ताशेरे ओढले. त्यामुळे पालिका आयुक्त के. एच. जगदीश यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बिश्‍वास यांची धास्तीच घेतली होती. आढावा बैठकीत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेण्याच्या त्यांच्या अनोख्या 'स्टाईल'मुळे काहीनी बैठकीला गैरहजर राहण्यास सुरूवात केली. महापालिकेकडून शहर स्वच्छता व घनकचऱ्यावर होणारा खर्च, प्रत्यक्षात चालणारे स्वच्छतेचे काम यावर तर त्यानी आरोग्य विभागाच्या कामकाजाचा पंचनामा केला. त्यातून मग तत्कालीन पालिका आरोग्याधिकारी डॉ. शशीधर नाडगौडा यांची त्यांच्या मूळ खात्यात बदली झाली.

सात जिल्ह्यांची जबाबदारी असलेले बिश्‍वास हे बेळगाव व हुबळी-धारवाड या दोन्ही महापालिकांमध्ये प्रशासक होते. पण बिश्‍वास यांच्या कामकाजावर बेळगावचे लोकप्रतिनिधी नाराज होते. त्यामुळे मग बिश्‍वास यांना प्रशासकपदावरून हटविण्याच्या हालचाली सुरू झाल्या. त्या हालचाली यशस्वी झाल्या व त्याना बेळगाव महापालिकेच्या प्रशासक पदावरून हटविण्यात आले. पण हुबळी-धारवाड महापालिका प्रशासकपदी कायम ठेवण्यात आले. प्रशासक असताना बिश्‍वास यानी बेळगाव महापालिकेबाबत अनेक महत्वाचे निर्णय घेतले होते. त्यांना हटविल्यानंतर महापालिकेने त्या निर्णयांची अंमलबजावणी केली नव्हती. आता ते पुन्हा आले तर त्या निर्णयांच्या अंमलबजावणीचा आढावा घेणार हे नक्की आहे. त्यामुळेच अधिकाऱ्यांची धास्ती वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘NO REFUND, NO EXCHANGE’ बोर्ड लावला म्हणून पैसे परत मिळणार नाहीत? वस्तूमध्ये प्रॉब्लेम आल्यास ग्राहक काय करू शकतो? पाहा

ESIC Medical College : हरिद्वारमध्ये ESIC मेडिकल कॉलेजला मंजुरी; प्रत्येक बॅचमध्ये ५० MBBS विद्यार्थ्यांना प्रवेश

Ladki Bahin Yojana 1800 Viral Claim : लाडकी बहीण योजनेत मिळणार 1800 रुपये? सोशल मीडियावरील 'तो' दावा दिशाभूल करणारा; DGIPR कडून फॅक्टचेक

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर १० ऑक्टोबरला CJPचे आंदोलन

Dino Morea: मिठी गैरव्यवहार प्रकरणी अभिनेता डिनो मोरियाची 8 तास चौकशी, जबाब नोंदवून सोडलं; चौकशीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT