Fifteen hundred former MLAs from the state will pay a monthly pension for Corona measures  
कोल्हापूर

राज्यातील पंधराशे माजी आमदार कोरोनाच्या उपाययोजनांसाठी देणार महिन्याची पेन्शन... 

सकाळवृत्तसेवा

जयसिंगपूर - राज्यावरील कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी सर्वच पातळ्यांवर प्रयत्नांची पराकाष्टा केली जात आहे. समाजातील सर्वच घटकांकडून कोरोनाला हरविण्यासाठी आपल्या परीने योगदान दिले जात आहे. शासनाला पाठबळ देण्यासाठी राज्यातील पंधराशे माजी आमदारांची एक महिन्याची पेन्शन कोरोनाच्या उपाययोजनांसाठी देण्याबाबतचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहे. यातून साडेसात कोटींचा निधी उपाययोजनांसाठी मिळून माजी आमदारांचेही यासाठी योगदान लाभणार असल्याची माहिती, शिरोळचे माजी आमदार उल्हास पाटील यांनी दिली. 

कोरोनाचे राज्यावरील संकट गडद होत आहे. देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत चालल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तीन आठवड्यांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे भविष्यात मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागणार असला तरी आजमितीस कोरोनाला हद्दपार करण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज आहे. लॉकडाऊनच्या काळात घरी बसून कोरोनाला हरविण्याची जिद्द शिरोळ तालुक्यातील जनतेने बाळगली आहे. यामुळेच अद्याप शिरोळ तालुक्यात एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आला नाही. 

तालुक्यातील आरोग्य यंत्रणेची माहिती घेत आहे. अनेक आरोग्य केंद्रांना भेटी देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. शासन पातळीवर सर्व उपाययोजना सुरु असल्या तरी कोरोनाविरुध्दच्या लढाईत प्रत्येकाचेच योगदान लाभत आहे. सोशल डिस्टन्सींगसह विविध प्रकारच्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. लॉकडाऊनच्या काळात गोरगरीबांना जीवनावश्यक वस्तूंची झळ बसू नये यासाठी शेतकऱ्यांसह सेवाभावी संस्थाही पुढे आल्या आहेत. वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, पोलिस आणि महसूल प्रशासनाने जीवाचे रान करुन विविध उपाययोजना प्रभावीपणे राबविल्या आहेत. 

शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेतनातील काही भाग कोरोनाविरुध्द लढ्यासाठी घेण्यात आला असून यामध्ये आता माजी आमदारांनीही योगदान देण्याचा संकल्प केला आहे. माजी आमदार समन्वय समितीने मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन एक महिन्याची पेन्शन यासाठी देण्याचा निर्धार केला असल्याचे श्री पाटील यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: दुसऱ्या T20I सामन्यातील भारताच्या पराभवानंतर गौतम गंभीरचं सूर्यकुमारसोबत वाजलं? Viral Video मुळे चर्चेला उधाण

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी घेतली मृत डॉक्टर युवतीच्या कुटुंबियांची भेट; ''राजकारण करण्यापेक्षा सर्वांनी एकजुटीने लढा...''

Georai News : बीडच्या गेवराईत रहात्या घरातच युवकाने गळफास घेऊन जीवन संपविले; कारण अस्पष्ट

Parner News : वाळू वाहतुकदारास दंड करणा-या अधिकाऱ्यांकडूनच १५ लाख ५१ हजार रुपये दंड वसूल केला जाणार

Akola News : बीपी तपासायला सांगताच घातला गोंधळ, उपचार सुरु असतानाच रुग्णाच्या कुटुंबियांचा डॉक्टरांवर हल्ला, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT