fight between two groups on panhala
fight between two groups on panhala 
कोल्हापूर

 कोल्हापूरच्या तरुणांची पन्हाळ्यावर फ्री स्टाईल हाणामारी ; धारधार हत्यारांचा वापर 

सकाळ वृत्तसेवा

आपटी - पन्हाळा येथील तबक वन उद्यानाजवळ कोल्हापूरच्या तरुणांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. धारधार हत्यारे व दगडफेक झाली. याबाबत पन्हाळा पोलिसांत दागिने हिसकावल्याची व जीवे मारण्याची धमकी दिल्याची तसेच महिलांना शिवीगाळ करून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याची परस्परविरोधी तक्रार दाखल झाली असून पाच जणांवर गुन्हे नोंद केला आहे. 

पोलिसेंतून मिळालेली माहिती अशी, राहुल राजेंद्र काकरे (जुना बुधावर पेठ, कोल्हापूर) परिवारासह पर्यटनासाठी आले असताना अभिषेक अनिल भोसले (कुंभार गल्ली, कोल्हापूर), अमय ढेरे व ताहीर शेख (सोमवार पेठ, घिसाड गल्ली, कोल्हापूर) यांनी मोटार आडवी मारून पूर्वीच्या भांडणाच्या रागातून अभिषेकने काकरे यांच्यावर धारधार चाकूने हल्ला केला. अभिषेकच्या सहकाऱ्यांनी काकरेच्या घरातील महिलांना शिवीगाळ करून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. आज तुला जिवंत ठेवत नाही, असे म्हणत काकरे यांना लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करून गळ्यातील चार तोळ्याची सोन्याची चेन ओढून घेतल्याचे राहुल काकरे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. 

दरम्यान राहुल काकरे व वीरेंद्र विलास भोसले (जुना बुधवारपेठ, कोल्हापूर) यांनी चाकू व दगड घेऊन कोल्हापुरात तू गावला नाहीस आता तुला काय ते दाखवतो असे म्हणत अभिषेक भोसले यांच्यावर हल्ला केला. तो चुकवतताना अभिषेकच्या डोळ्याजवळ दगड लागल्याने ते जखमी झाले. अभिषेक यांना लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करून गळ्यातील चार तोळ्याची सोन्याची चेन ओढून घेल्याचे अभिषेक भोसले याने फिर्यादीत नमूद केले आहे. परस्परविरोधी फिर्यादीवरून पन्हाळा पोलिसांत पाच जणांवर गुन्हे नोंद झाला आहे. पोलिस निरीक्षक ए. डी. फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भागवत तपास करत आहेत. 
 

 संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता मसाल्यातही भेसळीची फोडणी! लाकडाचा भुसा, Acid चा वापर; १५ टन बनावट मसाला जप्त

Aavesham: 30 कोटींचं बजेट अन् कमाई 140 कोटी; ब्लॉकबस्टर ठरला फहाद फासिलचा आवेशम, ओटीटीवर कधी होणार रिलीज?

Karan Johar : "आई सोबत टीव्ही पाहत होतो पण.. " करण जोहर भडकला, कॉमेडीयनने मागितली माफी; कोण आहे केतन सिंह ?

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

SCROLL FOR NEXT