Fighting Between Two Brothers In Uttur Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

भाऊबंदकीतून फोडली घराची कौले

सकाळवृत्तसेवा

उत्तूर : शेतीच्या वाटणीवरून येथील हावळ गल्लीतील आपके परिवारात तुंबळ हाणामारी झाली. त्यामध्ये दोन महिलासह पाचजण जखमी झाले. भाऊबंदकीची खुन्नस एवढी ताणली गेली की, यातील एका भावाने घराला शिडी लावूृन छपरावर चढून कौले विस्कटून टाकण्यात आली. घरात घुसून प्रांपजिक साहित्य विस्कटून टाकले. याबाबत परस्पर विरुद्ध फिर्याद दाखल झाली आहे. महिलेने आपला विनयभंग झाल्याची फिर्यादही पोलिसात दाखल केली आहे. 

दुपारी बारा वाजता आपके परिवाराचा गट नंबर 1320 मध्ये शेताच्या वाटणीवरुन वाद झाला. यानंतर कुमुद रुपेश आपके यांनी पोलिसांत फिर्याद दिली. यामध्ये असे, म्हटले आहे की, सुनील बाळू आपके, संदिप तुकाराम आपके, विमल बाळू आपके, नंदा केसरकर यांनी आपले पती रुपेश आपके, सासू शांता आपके यांना माराहाण केली व लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. यानंतर आपण राहत असलेल्या गावातील घरावर चढून घराची कौले फोडली व घरात अनाधिकृतपणे घुसून प्रापंचिक साहित्य विस्कटले. 

दरम्यान, संदीप तुकाराम आपके यांनी बबन आपके, रूपेश आपके, कुमुद आपके, संजिवनी माने यांच्या विरुद्ध फिर्याद दिली. यामध्ये रुपेश आपके यांनी मेसकाठीने माराहाण केल्याची फिर्याद दाखल केली. पुढील तपास सहाय्यक फौजदार कोचरगी व महिला हवालदार तारडे करीत आहेत.  

 
 

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Latest Marathi News Updates : पन्हाळगडाचा जागतिक वारसा यादीत समावेश, कोल्हापूरसाठी गौरवाचा क्षण - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT