Fighting two groups in Jagtap nagar crime marathi news 
कोल्हापूर

दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले ;  दगड आणि काठ्यांचा वापराने मारामारी

सकाळ वृत्तसेवा

कळंबा (कोल्हापूर) : गणेश मंडळाचा अध्यक्ष कोण यावरून पाचगाव जवळील जगताप नगरात दोन गटात मारामारी झाली. युवकांनी दगड आणि काठ्यांचा वापर परस्परांना मारण्यासाठी केला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. याबाबत रात्री उशिरापर्यंत करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. अचानक घडलेल्या या मारामारीमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. 

जगताप नगरात दोन गटात मारामारी 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहितीनुसार, ओमकार ग्रुप मित्र मंडळामध्ये दोन गट पडले आहेत. त्यामुळे गेली अनेक वर्ष किरकोळ कारणावरून येथील कार्यकर्त्यांमध्ये वाद धुमसत होता. आज (ता. 15) गणेश जयंती साजरी करण्याच्या निमित्ताने सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. 

मंडळाच्या अध्यक्षपदावरून झाला वाद. 

दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यावेळी एकमेकावर तुफान दगडफेक करत काठीने मारहाण केली. त्यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे समजते. याबाबत घटनेचे गांभीर्य ओळखून करवीर पोलिसांनी येथील परिसरामध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवला असून दोन्ही गटातील कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्याचे रात्री उशिरापर्यंत काम सुरू होते. 

संपादन- अर्चना बनगे
.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IndiGo Flight: विमान उड्डाणाच्या काही क्षण आधी मोठा ट्विस्ट! पायलटचा उड्डाणास नकार; प्रवाशांचे आंदोलन

Junior Asia Cup Hockey: तब्बल १९ गोल... भारताच्या पोरींनी उडवली पाकिस्तानची पुरती धुळधाण! सेमीफायनलमध्ये दिमाखात धडक

LIC Investment: फक्त 24 रुपये भरून मिळेल 50 लाखांचा इन्शुरन्स! LIC ची बेस्ट स्कीम पाहिली का?

Viral Video : आधी पैसे द्या, मगच जेवण करा! या देशातील लग्नाची अनोखी प्रथा पाहून भारतीय महिलेलाही बसला धक्का, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Marathi News Live Updates : माहिती अधिकाराचा बोजवारा, तीस दिवसांत मिळणे अपेक्षित असलेल्या माहितीसाठी साडेतीन वर्षांचा विलंब; स्वाक्षरीसाठीही तब्बल ११ महिने

SCROLL FOR NEXT