The final decision of the coronation ceremony will be made in the next two days 
कोल्हापूर

शिवराज्याभिषेक सोहळाचा अंतिम निर्णय येत्या दोन दिवसांत घेवु : खा.युवराज संभाजीराजे छत्रपती

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुर्गराज रायगडावर सहा जूनला शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे पदाधिकारी व शिवप्रेमींशी चर्चा करून येत्या दोन दिवसांत निर्णय घेणार आहे, अशी माहिती समितीचे मार्गदर्शक खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी दिली.

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रातील रुग्णांच्या संख्येचा आकडाही चिंतेचे वातावरण निर्माण करत आहे. कोरोनाच्या या संकटात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होणार का, अशी विचारणा शिवप्रेमींतून होत आहे. संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही वर्षांत शिवराज्याभिषेक सोहळा लोकोत्सव झाला आहे. लाखो शिवप्रेमींची रायगडावर गर्दी होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर शिवराज्याभिषेक सोहळा पोचला आहे. लाखो शिवप्रेमींच्या जेवणाची सोय समितीतर्फे गडावर केली जाते. त्यामुळे दरवर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्याची उत्सुकता असते.

वाचा - इथं कोरोना नाही ; इथे फक्त आम्ही अन् आमचा निसर्ग...
 
शिवराज्याभिषेक सोहळा अवघ्या महिन्यावर आला आहे. कोरोनाच्या संकटात सोहळा होणार की नाही, अशी विचारणा होत आहे. शिवप्रेमींच्या नजरा गडाकडे लागल्या आहेत. याबाबत संभाजीराजे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, "कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. गडावर तर लाखो शिवप्रेमी गर्दी करतात. कोरोनाला प्रतिबंध घालायचा असेल तर शासनाच्या निर्देशांचे पालन करावे लागेल. त्यामुळे या सोहळ्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, समितीचे पदाधिकारी व शिवप्रेमी यांच्याशी चर्चा करणार आहे. येत्या दोन दिवसांत ही चर्चा होईल. त्यानंतर शिवराज्याभिषेक सोहळ्या संदर्भातील निर्णय जाहीर करणार आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Crisis: पेट्रोल-डिझेलनंतर LPG दर वाढणार का? देशात इंधनाचा किती साठा शिल्लक? सरकारने संपूर्ण आकडाच सांगितला

Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गाचा आराखडा पुन्हा बदलला, लांबी थेट 856 किमी! आता तुमच्या जिल्ह्यातून जाणार का? पाहा नवीन नकाशानुसार यादी

Kalyan: क्रूरतेची सीमा गाठली! भटक्या कुत्र्यांना मारून नाल्यात फेकलं, केडीएमसीच्या कंत्राटदाराचं कृत्य

Latest Marathi News Live Update : जालना जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही इंधन तुटवडा, इंधनाअभावी अनेक पेट्रोल पंप बंद

महाराष्ट्र सोडण्याच्या विचारात आहेत नाना पाटेकर? भर सभेत मंत्र्यांसमोर केलं विधान, म्हणाले, 'खेड्यातली माणसं...'

SCROLL FOR NEXT