finance department in zilla parishad kolhapur commission problem in kolhapur 
कोल्हापूर

लाखाला शंभरचा हप्ता, कमिशनसाठी वाढले टेबल ; ‘वित्त’मध्ये होतीये लाखोंची ‘वरकमाई’

सदानंद पाटील

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागात कमी-अधिक प्रमाणात वरकमाई सुरू आहे. मात्र वित्त विभागात कमिशनसाठी वाढलेले टेबल, प्रत्येक सहीसाठी घेतले जाणारे पैसे, न दिल्यास कामात होणारी कुचराई यामुळे कंत्राटदार वैतागले आहेत. नुकतेच एका कंत्राटदाराकडे धनादेश घेण्यासाठी ३ हजार मागितले. संतापलेल्या कंत्राटदाराने वित्त विभागाचे वाभाडे काढले.

जिल्हा परिषदेत दरवर्षी १ हजार ते १२०० कोटींची उलाढाल होते. यातील किमान ७५ टक्‍के निधीचा खर्च वित्त विभागाच्या मान्यतेने होतो. याचा विचार करता लाखाला शंभर दराने वित्त विभागात दररोज किती लाखांची वरकमाई होते, याचा विचारच केलेला बरा. बांधकाम, शिक्षण, आरोग्य असो की समाजकल्याण, महिला बालकल्याण या विभागांच्या वित्तशी संबंधित फाईल वित्त विभागाकडे जातात.

सर्वच बिलांच्या फाईल चार कर्मचारी, अधिकाऱ्यांकडे सहीसाठी जातात. या प्रत्येक टेबलला लाखाच्या बिलास १०० प्रमाणे कमिशन द्यावे लागते. म्हणजेच १ लाखाच्या बिलास ४०० रुपये कमिशन देण्यात येते. दररोज लाखो रुपयांच्या फाईल जातात. त्यामुळेच या विभागात प्रत्येक टेबलसाठी चढाओढ लागते. सायंकाळी कार्यालय संपल्यानंतर चार वसुली अधिकारी एकत्र येवून इमान इतबारे जमा झालेल्या पैशाचे वाटप करतात.

मलईच्या टेबलसाठी तर अधिकाऱ्यांवर दबाव आणणारे कर्मचारीही कार्यरत  आहेत, हे विशेष. जो कमिशन देत नाही त्याच्या बिलांना, फायलींना  हात लागत नाही. कर्मचाऱ्यांच्या डीसीपीएसच्या फाईल धूळखात आहेत. टपालातील फाईल या संबंधित व्यक्‍ती आल्याशिवाय त्याला हात लागत नाही. लुटीस पायबंद घातला नाही, तर त्याचे पर्यवसान घडामोडीत घडण्याची शक्‍यता आहे.

"सळी, डांबर, सिमेंटचे दर वाढले आहेत. कोरोनामुळे निधी आलेला नाही. केलेल्या कामाचे व्याज भरून कंबरडे मोडले आहे. पत्नीसह मुलाबाळांचे सोने-नाणे गहाण ठेवून व्यवसाय टिकवून आहोत; मात्र कमिशन वाटपाने भीक लागण्याची वेळ आली आहे. वित्त विभागात प्रत्येक टेबलला पैसे दिल्याशिवाय काम होत नाही. ही वरकमाई थांबली नाही तर वित्त विभागावर मोर्चा काढू." 

- विजय हुल्ले, कंत्राटदार

"वित्त विभागातील वरकमाई वाईट आहे. सदस्यांनी एखादे काम सुचवले तर त्यातही वाटा मागणारी प्रवृत्ती येथे काम करतेय याचे शल्य आहे. अधिकाऱ्यांचा काहीही धाक राहिलेला नाही. त्यामुळे प्रत्येक टेबलचा लेखाजोखा होणे आवश्‍यक आहे."

- प्रा. शिवाजी मोरे, सदस्य
 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parbhani News : अतिवृष्टीग्रस्त परभणी जिल्ह्यासाठी १२८ कोटींची आर्थिक मदत मंजूर; शेतकऱ्यांना थेट खात्यात जमा होणार नुकसानभरपाई

Pune Heavy Rain: पुण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, वाहतूक ठप्प; पुणेकर खोळंबले

Latest Maharashtra News Updates : अक्कलकोट तालुक्यात ओला दुष्काळाची स्थिती – जयकुमार गोरे

Parner Crime : सातबारा उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी आठ हजारांची लाच घेताना कामगार तलाठ्याला रंगेहाथ पकडले

Pune Heavy Rain : पाषाण परिसरात मेघगर्जनेसह पावसाची हजेरी; चाकरमान्यांचे हाल, सखल भागात पाणी साचले

SCROLL FOR NEXT