Find out whether the distribution of Zilla Parishad Swanidhi Nidhi will affect the office bearers 
कोल्हापूर

जिल्हा परिषद स्वनिधी निधीचे वाटप पदाधिकाऱ्यांना भोवणार का ते जाणून घ्या

ओंकार धर्माधिकारी

कोल्हापूर ः जिल्हा परिषदेतील स्वनिधी आणि 13 व्या वित्त आयोगातील निधीचे सन्यायिक वाटप केले आहे का? याबाबत उच्च न्यायालयात गुरुवारी (ता.10) म्हणणे मांडण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिले. माजी सभापती वंदना मगदूम यांच्या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी झाली. एकूण निधी वाटपाचे प्रकरण अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना भोवणार असल्याचे चित्र दिसते आहे. 
जिल्हा परिषदेतील निधी वाटपातील असमतोलाविरोधात मगदूम यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याची सुनावणी आज न्यायाधीश आर. डी. धनुका व एम. जामदार यांच्या खंडपीठासमोर झाली. 28 जुलै 2020 च्या वित्त विभागाच्या पत्रामध्ये जि.प. स्वनिधी तीन लाख रुपये वापरण्याबाबत ठरले असल्याचे जे पत्र मगदूम यांना दिले आहे. त्या पत्राच्या अनुषंगाने सदस्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचा निधी दिला आहे काय? का तीन लाखापेक्षा जास्त निधी दिला आहे? याबाबत म्हणणे जिल्हा परिषदेने गुरुवारी (ता.10) उच्च न्यायालयामध्ये सादर करावेत. तसेच 13 व्या वित्त आयोगाबाबतच्या शासन निर्णया नुसार सर्व गटनिहाय व गण निहाय समन्यायीक वाटप करण्याचे शासन निर्णय होता. त्यानुसार वाटप केले आहे काय? किंवा कसे वाटप केले आहे? याबाबत सविस्तर म्हणणे देखील गुरुवारी (ता.10) सादर करावे असा आदेश दिले आहेत. त्यामुळे आता जि.प. स्वनिधी चा विषयीही उच्च न्यायालयाच्या नजरेत आला असल्याकारणाने जिल्हा परिषद प्रशासनाला याबाबत उच्च न्यायालयामध्ये सत्य माहिती व ठरलेले धोरण व कोणा कोणाला किती निधी दीला याबाबत माहिती सांगावी लागणार आहे. यामुळे पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी अडचणीत येणार असल्याची चर्चा जिल्हा परिषदेत सुरू आहे. ऍड. संदीप कोरेगावे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे युक्तिवाद केला. 
 

संपादन - यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Boycott: विकासाच्या बदल्यात फसवणूक? नवी मुंबईतील २७ गावांचा निवडणूकीवर बहिष्कार, राजकारण्यांच्या आश्वासनांचा अखेर कंटाळा

PM मोदी ख्रिसमसनिमित्त गेले चर्चेमध्ये, प्रभू येशूसमोर केली प्रार्थना; पाहा Video

धक्कादायक! पतीच्या छळाला कंटाळून नवविवाहितेनं घेतला गळफास; महिन्यापूर्वीच झालं होतं लग्न, नवऱ्यानं असं काय केलं?

CM Yogi Adityanath: दूरदृष्टीचा नेता आणि कवी मनाचा पंतप्रधान..! अटलजींच्या जन्मशताब्दीनिमित्त CM योगी आदित्यनाथ यांनी सांगितली आठवण

Ichalkaranji Election : दोन दिवसांत एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही; मात्र इचलकरंजीत अर्जांसाठी प्रचंड झुंबड

SCROLL FOR NEXT