fire short circuit in murbad damages by 15 lakh rupees in kolhapur 
कोल्हापूर

शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत पंधरा लाखांचे नुकसान

प्रकाश तिराळे

मुरगूड (कोल्हापूर) : येथील भरवस्तीत असणाऱ्या 'सहारा बिअरबार' ला शॉर्ट सर्किटमूळे भीषण आग लागली. या आगीत सुमारे पंधरा लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. आगीत फर्निचर, विदेशी दारु, फ्रीज अशा साहित्यांसह संपूर्ण इमारत जळून खाक झाली आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शहराच्या मध्यवर्ती भागात हुतात्मा तुकाराम चौकातून बसस्थानकाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत बंडा खंडागळे यांचा 'सहारा बिअर बार' आहे. शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास अचानक शॉर्टसर्किट होवून इमारतीस आग लागली. आगीत विदेशी मद्य, फर्निचर तसेच फ्रीज तिजोरी, कपाट असे साहित्य जळून खाक झाले. आग इतकी भीषण होती की इमारतीमधील संपूर्ण लाकडी सामान जळले आहे. 

मध्यरात्री आग लागल्याने सर्वत्र अंधार पसरलेला होता. आगीची घटना घडताच मुरगूड शहरातील वीजपुरवठा खंडीत करण्यात आला होता. अशा कठीण परिस्थितीत फायरमन प्रवीण देसाई यांनी जीवाची पर्वा न करता आग विझवण्यासाठी हिरीरीने पुढाकार घेतला. त्यामुळे जीवीतहानी टळली.

आगीने रौद्ररुप धारण केल्यानंतर शेजारच्या नागरिकांनी आरडाओरडा केला. त्यानंतर मुरगूड व कागल नगरपालिकेचे आग्निशमन बंब हमिदवाडा - मंडलिक व वेदगंगा - बिद्री साखर कारखान्याच्या बबांना पाचारण करण्यात आले. आग विझवण्यासाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न झाले. नगराध्यक्ष राजेखान जमादार, नगरसेवक संदिप कलकुटकी, आनंदा मांगले, जॉन्सन फर्नांडीस, भगवान लोकरे, संजय भरमाल, गोविंद घुंगरे - पाटील यांच्यासह परिसरातील शकडो नागरिकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.  

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नालासोपारा ZP शाळेत कुकरचा स्फोट; भडका उडताच गरम खिचडी चिमुकल्यांच्या अंगावर; 2 विद्यार्थ्यांसह महिला जखमी

नारकरांच्या घरी झाली सत्यनारायण पूजा; ऐश्वर्या यांनी स्वतः बनवला प्रसादाचा शिरा, कशी केली तयारी? दाखवला खास व्हिडिओ

Hartalika 2026: हरतालिकेच्या दिवशी ‘या’ 3 राशींवर होणार महादेव पार्वतीची विशेष कृपा; धनलाभाचे संकेत

Marathi News Live Updates : महाकाळा परिसरात मराठा आंदोलकांचा रास्ता रोको

Kharge Rally Controversy : मल्लिकार्जुन खर्गेंच्या रॅलीनंतर 'शुद्धीकरण' वाद पेटला! राज्यभरातून 80 तक्रारींनंतर पोलिसांचं मोठं पाऊल, काय आहे नेमकं प्रकरण?

SCROLL FOR NEXT