Firing in the air becomes a fashion in kolhapur 
कोल्हापूर

विषय हार्ड तर ; उडव की मग हवेत बार...

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - आमच्याकडे बंदुका आहेत. उत्सवाचा किंवा विजयाचा आनंद आम्ही हवेत गोळीबार करून साजरा करणार, अशी जणू फॅशनच होऊ लागली आहे. शस्त्र परवान्याबाबत जाचक अटींकडे डोळेझाक करून खुलेआम सुरू असलेला गेल्या दीड वर्षातील हा तिसरा प्रकार ठरला. 

हवेत गोळीबार बनते फॅशन

स्वसंरक्षणासाठी बंदूक असावी, अशी अपेक्षा मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यातूनच बंदूक परवान्यासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज जिल्हा प्रशासनाकडे येतात. परवान्याबाबतच्या जाचक अटींची पूर्तता करणाऱ्यालाच परवाना दिला जातो. याचा योग्य वापर करण्याची जबाबदारी संबंधित परवानाधारकावर असते; मात्र आज उत्सवाचा काळ असो की एकादा विजय संपादन केल्याचा प्रसंग अशावेळी थेट बंदूक बाहेर काढून थेट हवेत गोळीबार करून आनंदोत्सव साजरा करण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. गेल्या दीड वर्षात एमआयडीसी शिरोलीत दिवाळी सारख्या सणाच्यावेळी, इचलकरंजीत विजयाता उत्सव म्हणून हवेत गोळीबाराचे प्रकार घडले होते. यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई केली होती.

दरम्यान, काल भाच्याने मॅरेथॉनमध्ये मिळविलेल्या यशाचा आनंद मामाने थेट १२ बोअरच्या बंदूकीतून हवेत फायरिंग करून साजरा केला. त्याच्यावरही पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. परवानाधारक शस्त्राचा गैरवापर केला जाऊ नये यासाठी पोलिसांकडून विशेष दक्षता घेतली जाते. निवडणुकीच्या काळात अशी शस्त्रे प्रशासन ताब्यात घेते. लोकसभा निवडणुकीकाळत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने धडक मोहीम राबवून राधानगरी भागात छापे टाकून बेकायदेशीर बंदुका जप्त केल्या होत्या. शस्त्राचा गैरवापराबाबत कडक कारवाईची तरतुद असतानाही बंदुकांद्वारे हवेत होणारा गोळीबार हा चिंतेचा विषय निर्माण झाला आहे. कारण यात कोणलाही इजा होऊ शकते. असे प्रकार भविष्यात कायदा सुव्यवस्थेला बाधा ठरू शकतील अशी भीती निर्माण होत आहे. याबाबत प्रशासनाने वेळीच आक्रमक पावले उचलावी, अशी मागणी होत आहे.

 शस्त्र परवान्यासाठीच्या अटी

  •  स्थावर मालमत्तेचे उतारे
  • व्यवसायाची माहिती, उत्पन्नाचा दाखला
  • रहिवासीसह जन्म तारखेचे दाखले
  • हत्यार हाताळण्यास सक्षम असल्याबाबतचे शासकीय वैद्यकीय अधिकारीचे प्रमाणपत्र
  • हत्यार हाताळता येण्याबाबतचे ज्ञान प्रमाणपत्र
  • शेजारील लोकांची हरकत नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र 
  • घरच्या मंडळींची संमती
  • परवान्याची आवश्‍यकता, धोक्‍याची संभावन्याबाबत पुराव्यानिशी माहिती


७ हजार ६६२ परवानाधारक

सर्व प्रकारच्या शस्त्र परवानाधारकांची संख्या ७ हजार ६६२ इतकी आहे. निवडणुकीसह सण, उत्सव आणि संवेदनशील काळात अशी शस्त्रे ताब्यात घेण्याचा अधिकार जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार पोलिस प्रशासनाला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पतीपासून दूर रहायचं नाहीतर.. धमकीनंतर १९ वर्षीय तरुणीला २५ वर्षीय महिलेनं संपवलं, मुंबईत खळबळ

Latest Marathi News Live Update : शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा; डॉक्टरांनी दिला पाच दिवस रुग्णालयात उपचार घेण्याचा सल्ला

Chandrapur Mayor : ठाकरेंची ऐनवेळी भाजपला साथ, काँग्रेसचा १ मतानं पराभव; पक्षाचा आदेश डावलणाऱ्यांवर वंचितकडून कारवाई

Patan Politics: पाटणच्या रणधुमाळीत ‘टांगा पलटी, घाेडे फरार’; पालकमंत्र्यांच्या विजयी रॅलीत मंत्री गोरे, गणेश नाईकांना कार्यकर्त्यांनी डिवचले!

Salman Khan Threat : रणवीर सिंग नंतर आता सलमान खानच्या निकटवर्तीय अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी, कोट्यवधींची मागितली खंडणी

SCROLL FOR NEXT