The first laboratory of corona testing was started in Belgaum 
कोल्हापूर

कोरोना तपासणीची बेळगावातील पहिली प्रयोगशाळा झाली सुरू ; दररोज 90 स्वॅबची होणार तपासणी...

वृत्तसंस्था

बेळगाव - कोरोनाची बेळगावातील पहिली प्रयोगशाळा गुरूवारी (ता.23) सुरू झाली. या प्रयोगशाळेत आता दररोज 90 स्त्रावांची तपासणी होणार आहे. त्यामुळे बेळगावातील कोरोना संशयतींच्या स्त्रावांचे अहवाल लागलीच जिल्हा प्रशासनाला उपलब्ध होणार आहेत. गुरूवारी जिल्हा पालकमंत्री जगदीश शेट्टर, उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी आदींच्या उपस्थितीत या प्रयोगशाळेचे उद्घाटन झाले.

इंडीयन कौन्सिल ऑफ मेडीकल रिसर्च या संस्थेच्या बेळगाव शाखेत ही प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. नेहरूनगर येथे या संस्थेचे कार्यालय आहे, या संस्थेमध्ये असलेल्या व्हारलॉजी लॅबरॉटरीचा वापर कोरोना प्रयोगशाळा म्हणून करण्यास सुरूवात झाली आहे. बुधवारी (ता.22) या प्रयोगशाळेत बेळगाव जिल्ह्यातील 11 कोरोना संशयितांच्या घशातील स्त्रावांची तपासणी करण्यात आली आहे. गुरूवारपासून येथे दररोज 90 स्त्रावांची तपासणी केली जाणार आहे. या प्रयोगशाळेत स्त्रावाची तपासणी करण्यासाठी आवश्‍यक सर्व मूृलभूत सुविधा उपलब्ध आहेत. शिवाय तेथे पुरेसे मनुष्यबळही असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. अनुभवी वैज्ञानिक व प्रशिक्षित कर्मचारी स्त्राव तपासणी करण्याचे काम करणार आहेत.

तपासणीला वेग

बेळगाव जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या वाढली आहे. बेळगाव सध्या राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. पण येथील संशयितांच्या घशातील स्त्रावांची तपसाणी मात्र खूपच विलंबाने होत आहे. बेळगाव जिल्ह्यातील 135 जणांच्या स्त्रावांचे अहवाल अद्याप येणे बाकी आहेत. अशा स्थितीत आता बेळगावात प्रयोगशाळा झाल्यामुळे तपासणीला वेग येणार आहे. शिवाय अहवालही तातडीने उपलब्ध होणार आहे. आयसीएमआरमधील या प्रयोगशाळेला गेल्या आठवड्यात परवानगी मिळाली होती. म्हणजे तेथे असलेल्या प्रयोगशाळेचा वापर कोरोनाच्या संशयित रूग्णांच्या घशातील द्रवाच्या तपासणीसाठी करण्यास मंजुरी मिळाली होती. त्यामुळेच शनिवारी पालकमंत्री जगदीश शेट्टर, रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यानी तेथे बैठक घेवून पूर्वतयारीचा आढावा घेतला होता.

स्वॅब हुबळी किंवा शिमोगा येथे पाठवावे लागणार नाहीत

बुधवारपासून ही प्रयोगशाळा सुरू होणार होती, पण एक दिवस विलंबाने ती सुरू झाली. पण आता बेळगावकरांच्या दृष्टीने ही प्रयोगशाळा खूपच फायद्याची ठरणार आहे. यापुढे कोरोनाच्या तपासणीसाठी स्त्राव हुबळी किंवा शिमोगा येथे पाठवावे लागणार नाहीत. तपासणी होवून लवकर अहवाल मिळाला तर कोरोना प्रतिबंधक उपाययोजना तातडीने करणे प्रशासनासाठी शक्‍य होणार आहे. प्रयोगशाळेच्या उद्घाटनावेळी खासदार प्रभाकर कोरे, खासदार आण्णासाहेब जोल्ले, माजी मंत्री सतीश जारकीहोळी, आमदार महांतेश कवटगीमठ, जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोमनहळ्ळी आदी उपस्थित होते.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, 48 तास कोसळणार धो-धो पाऊस; दिवाळीपर्यंत पाऊस राहणार?

Latest Maharashtra News Updates : सामान्यांची एकीची वीण उसवू नये- शरद पवार

Navratri festival: '६०० वर्षांपूर्वीचे दुर्मिळ अलंकार रुक्मिणी मातेला परिधान करणार'; पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी

Pune Grand Challenge : सायकल स्पर्धा; दर्जेदार रस्त्यांचे आव्हान, नोव्हेंबरपर्यंत कामे करावी लागणार पूर्ण; अटीशर्तींवरून आरोप

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचं थैमान, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू; कसा होतो संसर्ग?

SCROLL FOR NEXT