Five Star Village program will be implemented in the country five villages in the kolhapur district selected 
कोल्हापूर

कोल्हापुरातील 'ही' पाच गावे होणार ‘फाइव्ह स्टार'

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : ग्रामीण भागातील जनतेला पोस्टाच्या माध्यमातून जास्तीत जास्त बॅंकिंग सुविधा मिळाव्यात, ग्राहकांना आर्थिक लाभाच्या विविध योजनांचा थेट फायदा मिळावा व ग्रामीण भागातील आर्थिक समावेशन योजनेमध्ये समाविष्ट करावे या हेतूने ‘फाइव्ह स्टार व्हिलेज’ कार्यक्रम देशात राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील पाच गावांची निवड केली आहे. पोस्टाच्या विविध उपक्रमांतर्गत उल्लेखनीय काम केल्याबद्दल त्यांची पायलट प्रोजेक्‍टसाठी निवड केल्याची माहिती कोल्हापूर विभागाचे प्रवर अधीक्षक ईश्वर पाटील यांनी दिली.


दरम्यान, केंद्रीय दूरसंचार व दळणवळण राज्यमंत्री संजय धोत्रे निवड झालेल्या गावांपैकी मडिलगेत (ता. भुदरगड) उद्या ( १०) दुपारी ३ वाजता योजनेचे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उद्‌घाटन करणार आहेत. या वेळी ते ग्राहक, कर्मचाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

योजनेत गावातील प्रत्येक घरात पोस्टाच्या पाच योजना पोहोचवण्यात येणार आहेत यामध्ये सेव्हिंग बॅंकेच्या योजना, सुकन्या समृद्धी योजना, आयपीपीबी खाते, टपाल जीवन विमा, प्रधानमंत्री जीवनज्योती बीमा योजना व जीवन सुरक्षा योजना यांचा समावेश आहे.   जनधन खाते, गॅस सबसिडी, शिष्यवृत्ती असे आर्थिक लाभ थेट प्रत्येक कुटुंबाला, नागरिकाला, विद्यार्थ्यांना मिळावेत. यासाठी फाइव्ह स्टार व्हिलेज कार्यक्रम प्रायोगिक तत्त्वावर पाच गावांमध्ये राबविण्यात येणार आहे. 

या गावांची निवड 


या उपक्रमात निवड झालेली गावे अशी 

मडिलगे बुद्रुक, वेसर्डे (ता. भुदरगड), दानोळी (ता. हातकणंगले), शिप्पूर तर्फ नेसरी (ता. गडहिंग्लज), कौलगे (ता. कागल).

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

"आमचं लग्न लोकांना मान्य नव्हतं" श्रुती मराठे- गौरव घाटणेकरचा धक्कादायक खुलासा; "तिची साथ नसती तर.."

Latest Maharashtra News Updates : मरकटवाडीच्या ग्रामस्थांचं विधानभवन बाहेर आंदोलन

Nargis Fakhri : 'तो मृतदेहावरचं मांस खायचा आणि मलाही..' अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव, म्हणाली, 'खणलेले मृतदेह काढून तो...'

SCROLL FOR NEXT