Kolhapur Flood Pune-Bangalore National Highway
Kolhapur Flood Pune-Bangalore National Highway esakal
कोल्हापूर

पुणे-बंगळूर महामार्गाला महापुराचं आव्हान; सहापदरीकरण करताना घ्यावी लागणार काळजी, अन्यथा होऊ शकतं मोठं नुकसान!

सदानंद पाटील

घुणकीपासूनच सहापदरीकरणाच्या रस्त्याची सुरुवात झाली आहे. किणी टोल नाक्यापर्यंत (Kini Toll Plaza) ठिकठिकाणी या रस्त्याचे काम सुरू आहे.

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाचे (Pune-Bangalore National Highway) सहापदरीकरण करण्याचे काम सुरू आहे. या महामार्गाचा जो भाग कोल्हापूर जिल्ह्यातून जातो, त्या अखंड मार्गावरील सुरक्षित वाहतुकीची आणि महापुराची आव्हाने स्पष्ट करणाऱ्या रिपोर्ताजचा प्रवास प्रत्यक्ष महामार्गवरूनच...

पुण्याहून बंगळूरकडे येताना राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूर जिल्ह्याची सुरुवात घुणकी या गावापासून होते. वारणा नदी ओलांडली की, सांगली जिल्ह्याची हद्द समाप्त होते आणि तिथून कोल्हापूर जिल्ह्याची हद्द सुरू होते. घुणकीपासूनच सहापदरीकरणाच्या रस्त्याची सुरुवात झाली आहे. किणी टोल नाक्यापर्यंत (Kini Toll Plaza) ठिकठिकाणी या रस्त्याचे काम सुरू आहे.

यापूर्वीच किणीसाठीचा जो बायपास रस्ता केला आहे, एकूणच हा संपूर्ण परिसर महापुराच्या कक्षेत येतो. अगदी घुणकीपर्यंतचा सर्व रस्ता वारणा नदीला महापूर आल्यानंतरही पाण्याखाली जातो. त्यामुळे रस्त्याची उंची अजून वाढवणे आवश्यक आहे. सकाळीपासून संध्याकाळी उशिरापर्यंत या रस्त्यावर रहदारी असते. किणीपासून पुढे सात किलोमीटर अंतरावर वाठार हे प्रमुख जंक्शन आहे.

तिथून एक रस्ता वडगाव मार्गे जयसिंगपूर, सांगलीकडे जातो. तर त्याच्याविरुद्ध दिशेला कोडोली मार्गे जोतिबा, पन्हाळा मार्गे कोकणाकडे जातो. तसेच उजव्या हाताला वारणानगर हा पूर्ण सहकाराचा सुप्रसिद्ध पट्टा आहे. साखर कारखानदारी, दूध संघ यामुळे या भागात वाहतूकदेखील मोठी आहे. ती अवजड वाहने या चौकातूनच पुढे जातात.

परिणामी, साखर कारखान्यांची धुराडी पेटली की उसाच्या वाहनांमुळे बऱ्याचदा वाहतुकीची कोंडी आणि अपघात घडतात. यामुळे वाठार येथे उड्डाणपुलाच्या खाली मोठा चौक करून त्या ठिकाणी चारी बाजूला जाणाऱ्या रस्त्यांची माहिती दिशादर्शक व्यवस्था तसेच पादचारी मार्ग, सेवा रस्ते करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यादृष्टीने विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.

उद्योग व्यवसायाला संधी

वाठारपासून पुढे गेले की, अंबपच्या दिशेने जात असताना देखील या सहापदरीकरणाच्या रस्त्याचे काम आपल्याला पाहायला मिळते. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग असल्याने इथे उद्योग व्यवसायाला मोठी संधी आहे. त्यामुळेच रस्त्याच्या दुतर्फा विविध कंपन्यांची शोरूम, महाविद्यालय, तसेच लहान मोठे उद्योग सुरू झाल्याचे पाहायला मिळतात. वाहनांची शोरूम, पेट्रोल पंप, हॉटेल्स, ढाबे यांची अक्षरशः रीघ लागलेली आहे.

राष्ट्रीय महामार्गावर गॅस पाईपलाईनचेही काम सुरू आहे. परिणामी त्याकामाशी निगडित कार्यालय आणि एक-दोन मोठे डेपो या मार्गावर आहेत. या अर्थाने औद्योगिकदृष्ट्या संपर्कसुलभ आणि समृद्ध असा हा परिसर आहे. रस्त्यामध्ये जो दुभाजक आहे, त्याचा दुरुस्ती होताना दिसत नाही. फूल झाडांच्या सोबतच मोठ्या प्रमाणात गवत देखील उगवले आहे. त्याची साफसफाई होताना दिसत नाही.

तसेच मुख्य रस्त्यावरच रस्त्यावरून अलीकडून पलीकडे जाण्यासाठी जी व्यवस्था आहे, क्रॉसिंग आहे ते अत्यंत असुरक्षित आहे. खासकरून अंबप फाट्यावर नेहमीच याची प्रचिती येते. भरधाव येणाऱ्या वाहनांमुळे या फाट्यावर हमखास अपघात होतात. त्यावर पर्याय कोण काढणार? खरेतर हा दीर्घकाळ प्रलंबित आणि दुर्लक्षित प्रश्‍न आहे.

औद्योगिक वसाहतीजवळ वर्दळ

टोपमधून थेट जोतिबाकडे जाण्याच्या रस्त्यावरसुधा वाहनांची नियमित वर्दळ असते. परंतु तिथे फाट्यावरून महामार्गावर येणाऱ्या वाहनांवर कोणतेही नियंत्रण नसल्याने थेट दोन्हीकडून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांचे बऱ्याचदा अपघात होतात. हीच परिस्थिती शिये फाट्यावरसुद्धा दिसून येते. यापुढे शिरोली औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या मार्गावर तर रोजचीच वर्दळ आहे. सायकलस्वार, दुचाकी, चारचाकी, अवजड वाहनांसह गर्दीने नेहमीच हा रस्ता गजबजलेला असतो.

कागलला उड्डाणपूल गरजेचा

दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावर तसेच पुढे आल्यावर कागल पंचतारांकित औद्यगिक वसाहत लागते. याठिकाणी मोठे चौक, दिशादर्शक फलकासह वाहतूक नियमन आवश्यकता आहे. ऐन महामार्गावर वसलेल्या कागल शहरवासीयांच्या मागणीनुसार दैनंदिन वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग, उड्डाणपूल गरजेचा आहे.

रस्त्याची उंची वाढावी

शिरोली फाटा, तर नेहमी पंचगंगा नदीच्या पुराखाली येणारा भाग आहे. महापुरात याठिकाणी राष्ट्रीय महामार्ग बंद होऊन जिल्ह्याचा थेट संपर्क तुटतो. या करीता पर्यायी पुलाची निर्मिती, इथल्या रस्त्याची उंची वाढवणे, आणि हे करताना महापुराचा धोका अजूनच वाढणार नाही याची योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे.

बास्केट ब्रीज गरजेचा

पुढे तावडे हॉटेल इथून तर उजवीकडे कोल्हापूरचे प्रवेशद्वार आणि डावीकडे गांधीनगर असा दुतर्फा अतिशय गर्दीचा आणि गजबजलेला परिसर असून येथे नियोजनपूर्वक बास्केट ब्रीज करणे गरजेचे आहे. पुढे आपण उचगाव मार्गाने किंवा त्याहीपुढे उजलाईवाडी मार्गाने सुधा कोल्हापूरमध्ये येऊ शकतो. त्यामुळे उचगाव आणि उजळाईवाडी या दोन्ही ठिकाणी रुंद रस्ते आणि उड्डाणपुलाची, गरजेनुसार मोऱ्यांची गरज आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: AIच्या माध्यमातून भाजपाविरोधी अजेंडा राबवण्याचा झाला प्रयत्न! Open AI चा खळबळजनक दावा

ब्रेकिंग! ‘आरटीई’ प्रवेशाला मंगळवारपर्यंत मुदतवाढ; शिक्षण संचालकांचे आदेश; आता मुदतवाढ नसल्याचेही स्पष्टीकरण

Nagpur Temp : नागपूरमध्ये नोंद झालेलं 56 डिग्री तापमान होतं चुकीचं! हवामान विभागाला का द्यावं लागलं स्पष्टीकरण?

Congress Boycott Exit Polls: मतदानोत्तर चाचणीच्या चर्चांवर काँग्रेसचा बहिष्कार; काँग्रेसनं का घेतला असा निर्णय?

Exit Polls 2024: एक्झिट पोल्स महत्वाचे आहेत का? 'या' कारणांमुळं चुकू शकतो अंदाज

SCROLL FOR NEXT