floods humen story from kolhapur Over the course of an hour similar picture emerged in many parts of the city 
कोल्हापूर

Video : पाणीच पाणी ; साहित्य भिजू दे, जीव तरी वाचू दे

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : ढगफुटीसदृश पावसाने मंगळवारी सर्वत्र अक्षरशः दाणादाण उडाली. जोरदार वाऱ्यासह पडणाऱ्या या पावसाने अगदी तासाभराच्या अवधीत शहरातील अनेक भागांत पाणीच पाणी असेच चित्र निर्माण झाले. शाहूपुरी, उद्यमनगर परिसरासह शहराच्या उपनगरांतील अनेक घरांत दोन ते पाच फुटांपर्यंत पाणी घुसले. प्रापंचिक साहित्याचे नुकसान झालेच; तर अनेकांच्या व्यवसायाचे साहित्यही पाण्यात तरंगू लागले. बुधवारी (ता. ९) या भागात नेमके काय चित्र होते, याचा घेतलेला धांडोळा.

संसार आला रस्त्यावर

जरगनगरात हातावरचे पोट असणाऱ्या जोशी कुटुंबाच्या घरात तासभराच्या पावसाचे पाणी सायंकाळी घरात शिरले. हाताला लागेल ते साहित्य वाचविण्याचा प्रयत्न कुटुंब प्रमुख महिलेने सुरू केला; पण बघता बघता चार फुटांवर पाणी पोचले. जीव वाचविण्याशिवाय त्यांना दुसरा पर्याय उरला नाही. भावाच्या मदतीने त्या घराबाहेर पडल्या. पण पावसाच्या पाण्याने घरातील सारे साहित्य वाहून गेले. जरगनगर ओढ्यालगत चैत्राली जोशी या आई, भाऊ, मुलीसह राहतात. भांडी विक्रीचा त्यांचा व्यवसाय आहे. सायंकाळनंतर पावसाचा जोर वाढला. बघता बघता जोशी यांच्यासह शेजाऱ्यांच्या घरात पाणी शिरण्यास सुरवात झाली. तशी जोशी कुटुंबासह इतरांनी घरातील साहित्य वाचविण्यास सुरवात केली. जोशी यांनीही तसा प्रयत्न सुरू केला. 
पण पावसाचा जोर जसजसा वाढला तसतसे पाणी मोठ्या प्रमाणावर घरात शिरले. तीन साडेतीन फुटांपर्यंत पाणी घरात शिरले. त्यामुळे जोशी यांनी साहित्य वाचविण्याचा प्रयत्न बंद केला. लहान मुलीसह त्या भावाच्या आणि पोलिसांच्या मदतीने कशाबशा सुरक्षितपणे पाण्यातून बाहेर पडल्या. 

चिंचोळ्या चॅनेलमुळे अडथळा
शिवाजी उद्यमनगर परिसरातील फडतरे मिसळसमोरील पाटील वाळू डेपो परिसरातील आठ ते दहा कारखाने आणि सात ते आठ घरात मंगळवारी पाणी शिरले. अनेकांच्या कारखान्यातील मोटारी पाण्याखाली गेल्या. गोडावूनमधील कागदाचे गठ्ठे पाण्याने भिजून गेले तर चारचाकी गाडी वारंवार स्टार्टर लावूनही चालू होत नसल्याचे चित्र आज या परिसराने अनुभवले. त्याचवेळी स्वच्छतेत सारीच मंडळी मग्न होती. या परिसरात सहा ते सात छोट्या-मोठ्या गल्ल्या आहेत आणि या गल्ल्यांतील सर्व सांडपाणी एकाच चॅनलमधून पुढे ओढ्याला जाते.  सांडपाणी निर्गतीकरणाची ही व्यवस्था शिवाजी उद्यमनगर स्थापन झाले तेव्हाची आहे आणि त्यात अद्यापही कोणतीच सुधारणा झालेली नाही. त्यामुळे पाण्याचा मोठा लोंढा निर्माण होतो आणि परिसरातील कारखान्यात आणि पाणी घरात पाणी घुसते आणि एकदम सर्वांची तारांबळ उडते. 

शाम सोसायटीचं दुखणं कायम

दरवर्षी पावसाळा आला, की शाम सोसायटीतील लोक चिंतित होतात. कारण शेजारून वाहणाऱ्या ओढ्याचे पाणी न चुकता त्यांच्या घरात शिरते. हा क्रम यंदाही चुकला नाही. अवघ्या दोन तासांच्या पावसाने ओढ्याचे पाणी घरामध्ये तीन फूट आले. नागरिकांना अख्खी रात्र जागून काढावी लागली. पाणी बाहेर काढणे आणि घर स्वच्छ करणे यात दुसरा दिवसही गेला. घरातील किमती वस्तू पाण्यापासून वाचविण्याची येथील रहिवाशांची धडपड सुरू झाली. अनेकांचे मोठे नुकसान झाले. 
देवकर पाणंद परिसरात शाम हाउसिंग सोसायटी आहे. मंगळवारी बघता बघता तीन फुटांपर्यंत पाणी आल्याने घरातील प्रापंचिक साहित्य कसे वाचवायचे, असा दिव्य प्रश्‍न नागरिकांना पडला. त्यांनी शक्‍य तेवढ्या वस्तू उंचावर नेऊन ठेवल्या. दरवर्षी हा त्रास किती सहन करायचा? महापालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन येथील ओढ्यावरील प्रकल्प हा रस्त्याच्या पुढील बाजूस करून दिलासा देण्याची मागणी आहे.

साहित्य भिजू दे, जीव तरी वाचवू

धडकी भरविणारे पाण्याचे लोट आणि मिनिटामिनिटाला वाढणारी पाण्याची पातळी यामुळे शाहूपुरीतील गल्लीबोळात मंगळवारी रात्री भीतीचे वातावरण निर्माण झाले. जयंती नाल्याचे पाणी बाहेर पडल्याने पंधरा मिनिटात बेसमेंट ओव्हरफुल्ल झाली. प्रापंचिक आणि व्यावसायिक साहित्य वाचविण्यासाठी रात्र लोकांनी जागून काढली. आजचा दिवस पाणी काढण्यात आणि साफसफाईसाठी खर्ची पडला. भिजलेले प्रिंटिंग मशीन, राउटर आणि साहित्य वाचविण्यासाठी धडपड सुरू होती. पंचमुखी गणेश मंदिराच्या मागे असलेल्या घिसाड गल्लीत विदारक 
असे चित्र होते. दुकानातील भिजलेले साहित्य पाहून अनेकांच्या डोळ्यांत पाणी उभे राहण्याची वेळ आली. दुकानात पाणी घुसले तरी लाखो रुपयांच्या मशिनरी खराब होण्याची भीती असते. नेमकी हीच स्थिती मंगळवार रात्रीच्या पावसामुळे झालेल्या पाण्याने केली. 

सर आली धावून, रस्ता गेला वाहून

पाऊस अवघा दोनच तास पडला; मात्र या पावसात बुदिहाळकर नगरमधील रस्ता वाहून गेला. सुमारे ४५ घरांमध्ये पावसाचे पाणी गेले. मंगळवारची रात्र येथील नागरिकांनी जागूनच काढली. अनेकांचे प्रापंचिक साहित्य पाण्यात तरंगत होते. शेजारून वाहणारा एकेकाळचा ओढा आता गटारीएवढा छोटा झाल्याने पाणी घरात आले, असे नागरिकांचे मत आहे. याच ओढ्याची संरक्षक भिंत जर वाढवली तर पाणी घरांमध्ये येणार नाही, असे नागरिक सांगतात. दोन तासांच्या पावसाने येथे होत्याचे नव्हते केले. 

शहराच्या दक्षिणेला असणारे बुदिहाळकरनगर हे उपनगर आहे. मंगळवारी रात्री बघता बघता शेजारील ओढ्याचे पाणी वस्तीमध्ये घुसले. घरात पाणी गेल्यामुळे प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले.  वरून येणाऱ्या रस्त्यावरून नदीप्रमाणे पाणी वाहू लागले. ड्रेनेजच्या कामासाठी इथला रस्ता उकरला होता. तो वाहूनच गेला. आता तेथे केवळ मातीचे ढिगारे आणि खडीचे दगड उरले आहेत. पूर्वी ओढ्याचे पात्र रुंद होते. नंतर ते अरुंद केले. इतके की एखादी गटार वाटावी. या गटारीतून बुदिहाळकरनगरच्या उत्तरेला असणाऱ्या उंचवट्यावरील सर्व उपनगरांचे पाणी या ओढ्यातून वाहते. पात्र अरुंद केल्याने हे सर्व पाणी परिसरात पसरले. या ओढ्याची संरक्षक भिंत अवघी दोन फुटांची आहे. ती जर पाच ते सहा फूट उंच केली तर पाणी वस्तीमध्ये येणार नाही, असे येथील नागरिकांचे मत आहे. 

शिवाजी उद्यमनगर

शिवाजी उद्यमनगर परिसरातील फडतरे मिसळसमोरील पाटील वाळू डेपो परिसरातील आठ ते दहा कारखाने आणि सात ते आठ घरात मंगळवारी पाणी शिरले. अनेकांच्या कारखान्यातील मोटारी पाण्याखाली गेल्या. गोडावूनमधील कागदाचे गठ्ठे पाण्याने भिजून गेले तर चारचाकी गाडी वारंवार स्टार्टर लावूनही चालू होत नसल्याचे चित्र आज या परिसराने अनुभवले. त्याचवेळी स्वच्छतेत सारीच मंडळी मग्न होती. या परिसरात सहा ते सात छोट्या-मोठ्या गल्ल्या आहेत आणि या गल्ल्यांतील सर्व सांडपाणी एकाच चॅनलमधून पुढे ओढ्याला जाते.  सांडपाणी निर्गतीकरणाची ही व्यवस्था शिवाजी उद्यमनगर स्थापन झाले तेव्हाची आहे आणि त्यात अद्यापही कोणतीच सुधारणा झालेली नाही. त्यामुळे पाण्याचा मोठा लोंढा निर्माण होतो आणि परिसरातील कारखान्यात आणि पाणी घरात पाणी घुसते आणि एकदम सर्वांची तारांबळ उडते. 

बघता बघता घरात पाणी

येथील नाल्याशेजारी सुमारे पन्नास ते साठ घरांमध्ये रात्री दहाच्या सुमारास पाणी शिरले.अचानक पाणी शिरल्याने लोकांची धावाधाव झाली. घरातले साहित्य जैसे थे ठेवत नागरिकांनी घराचे छत, िजन्यांचा आधार घेतला. यावेळी तरुणांच्या तुकडीने मदतीला धाव घेतली. रात्री बाराच्या सुमारास पाणी ओसरु लागल्याने लोकांच्या जीवात जीव आला; परंतु लोकांना संपूर्ण रात्र मात्र जागत काढावी लागली. घरातील प्रापंचिक साहित्याचे नुकसान अधिक प्रमाणात झाले. सकाळी पाण्याचे टॅंकर मागवत घरे साफ करण्यात या परिसरातील लोक गुंतले होते.
दरम्यान, जरगनगर - पाचगाव रोडला जोडणारा पूल मोठ्या प्रमाणात खचला आहे. महिन्याभरापूर्वी बांधलेली संरक्षक भिंत पाण्याच्या प्रवाहामुळे पूर्ण कोसळली आहे. पुलाचे काम निकृष्ट असल्याचा आरोप करत या प्रकारामुळे स्थानिक संतप्त आहेत.


ओढ्यात सुरू झालेल्या प्रकल्पामुळे पाण्याची गती कमी होते. परिणामी पावसाळ्यात ओढ्याचे पाणी थेट परिसरातील घराघरात शिरते. प्रशासनाने याचा विचार करून प्रकल्पाचे ठिकाण बदलावे.
- विजया मगदूम

सात वर्षांचे हे दुखणं आहे. कळंबा, साळोखेनगर परिसरातून या ओढ्याला पाणी येते. प्रशासनाने या ओढ्याच्या दोन्ही बाजूला किमान पाच ते सहा फुटांची भिंत बांधून नागरिकांना दिलासा द्यावा. 
- वैजयंती भोसले

रात्री घरात तीन फूट पाणी शिरले. ते पाणी काढण्यात अख्खी रात्र गेली. दरवर्षी आम्ही किती नुकसान सहन करायचे? वेगवेगळ्या भागातून मोठ्या प्रमाणावर मिसळणाऱ्या पाण्यावर महापालिकेने तातडीने इतर उपाययोजना कराव्यात. 
  - प्रतीक्षा जोग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : नाशिक जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलंबित

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT