कोल्हापूर

डोंगरावरील विदेशी वनस्पतींच्या लागवडीने वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात

गेल्या ४० वर्षांपासून एकसूरी पद्धतीने विदेशी वृक्षांची लागवड केली आहे

निवास मोटे

जोतिबा डोंगर : कोल्हापूर जिल्ह्यातील (kolhapur district) जोतिबा डोंगर, पोहाळे तर्फ आळते, सादळे मादळे गिरोली दाणेवाडी या भागातील डोंगर पठारावर सामाजिक वनीकरण व वन विभाग यांनी काही विदेशी वृक्षांची लागवड केली आहे. गेल्या ४० वर्षांपासून एकसूरी पद्धतीने विदेशी वृक्षांची लागवड (foreign tree) केल्यामुळे मोर, लांडोर, ससा, साळिंदर, भेकर, कोल्हा विविध जातीचे पक्षी त्यांचे अस्तित्व नष्ट होऊ लागल्याचे चित्र दिसत आहे.

सध्या वानरानी आपली निवासस्थाने मानवी वस्तीच्या भागात वसवली आहेत. त्यांच्या सततच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांनी बांधावरची झाडे तोडून टाकली आहेत. वानरांनी सध्या कौलारू घरे स्लॅब या ठिकाणी अतिक्रम केल्याने त्यांचा लोकांना त्रास होत आहे. वन्यजीव तसेच पशुपक्ष्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी सामाजिक वनीकरण विभाग, वन विभाग यांनी विदेशी झाडे लावली होती. ती तोडून त्याठिकाणी या पशुपक्षी, प्राण्यांना उपयुक्त देशी झाडे जसे की, जांभळू, लिंबू, चिंच, वड, पिंपळ, शिरीष यांची लागवड केल्यास या वृक्षांचे जतन होईल. या विदेशी वनस्पतींवर कोणताही पशुपक्षी बसत नाही. देशी झाडे लावणे आवश्यक झाले आहे. यामुळे जैवविविधतेला व वन्यजीवांना धोका पोचणार नाही.

जोतिबा पोहाळे या भागात आहेत या विदेशी वनस्पती -

  • गिरीपुष्प (ग्लिरीसिडीया) ऑस्ट्रेलियन बाभूळ,

  • निलगिरी, गुलमोहर, रानमोडी

ही देशी झाडे लावा व जगवा -

जांभूळ, आंबा, चिंच अर्जुना बेहरडा, शिरीष, काटे बाभूळ, वड, पिंपळ, उंबर, कडूनिंब, भोकर

या भागात हे आहेत पक्षी -

खंडया, सातभाई, पोपट सुगरण, वेडा राघू, टिटवी, साळुंखी, स्वर्गीय नर्तक, राखी धनेश, बुलबुल, भारद्वाज, बहिरी ससा, घुबड, गाय बगळे, नाचन, खाटीक, सुर्यपक्षी यासह ११० प्रकारचे पक्षी आहेत.

हे प्राणी येथे आहेत -

ससे, रानमांजर, कोल्हा, साळींदर, घोरपड, रानडुक्कर, गवे, बिबटया, वानर, इजाट, विविध जातीचे सर्प

"सामाजिक वनीकरण, स्थानिक स्वराज्य संस्था व वनविभागाने विदेशी वनस्पतींच्या नवीन रोपांची निर्मीती तसेच लागवड थांबवण्याची गरज आहे. विदेशी झाडांची लागवड थांबवून त्या ठिकाणी नव्याने या भागातील जैवविविधतेस अनुकूल असणारी देशी झाडे लावणे गरजेचे आहे. तरच येथील स्थानिक वन्यजीवांचा आधिवास टिकून राहील."

- सुरेश बेनाडे, निसर्ग मित्र, पोहाळे तर्फ आळते (ता. पन्हाळा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivdeep Lande contest Bihar Election: ‘सिंघम’ शिवदीप लांडे यांचीही आता बिहारच्या निवडणूक रिंगणात उडी; उमेदवारी अर्ज दाखल करणार!

EPFO New Option : 'ईपीएफओ' सदस्यांना मिळाला नवा पर्याय! आता 'PF' रक्कम पेन्शन खात्यात वळवता येणार

ब्रेकिंग! साहेबांच्या नावाने लाच मागणारा एजंट ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात; मयताच्या भावाकडे, पत्नीकडे पीएफ, पेन्शन काढून देण्यासाठी मागितले २५००० रुपये

Ajit Pawar : जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी करण्याचे उपमुख्यमंत्री पवार यांचे आदेश

Supreme Court : मृत्युदंडाच्या पद्धतीवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्रावर नाराजी

SCROLL FOR NEXT