Former Chief Minister devendra fadnavis apologise over tweet on chhatrapati rajarshi shahu maharaj tweet 
कोल्हापूर

...अखेर देवेंद्र फडणवीस यांनी मागितली माफी 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (ता. ६ ) राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतीदिनी सोशल मीडियावर त्यांचा सामाजिक कार्यकर्ते असा उल्लेख केला होता. ही गोष्ट लक्षात येताच शाहूप्रेमींतून संताप व्यक्त होवू लागला होतो. फडणवीस यांच्यावर सोशल मीडियावरूनही जोरदार टीका झाली. त्यांनी तमाम महाराष्ट्राची माफी मागावी या मागणीला जोर धरू लागला होता. खासदार संभाजी राजे छत्रपती यांनीही आज ट्विट करून ''फडवीस यांनी कालच्या प्रकारावर सर्व शिव-शाहू भक्तांची माफी मागावी. माझ्यासाहित संपूर्ण राज्यातील शिव-शाहू भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत.'' अशी मागणी केली होती. अखेर आज संभाजी राजे यांच्या ट्विटला रिट्वित करत फडणवीस यांनी कालच्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली. 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजर्षी छत्रपती शाहूप्रेमी आणि महाराष्ट्राची माफी मागावी. अन्यथा त्यांना कोल्हापुरात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा आज शिवसेनेने दिला होता. शिवाय शिवसेनेने आज राजर्षी शाहू समाधीस्थळ येथे निदर्शने केली आणि फडणवीस यांचा निषेध नोंदवला. 
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले, ""राजर्षी शाहूंचे कार्य केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात पोचले आहे. फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहिला आहे. मात्र, तरीही त्यांना राजर्षी शाहू कळले नाहीत का? त्यांनी घडलेल्या प्रकाराबाबत तात्काळ माफी मागितली पाहिजे.'' दरम्यान, जिल्हाप्रमुख संजय पवार, देवस्थान समितीचे सदस्य शिवाजीराव जाधव, सुजीत चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते.

संभाजी ब्रिगेडनेही फडणवीस माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांना कोल्हापुरात प्रेवेश बंदी करावी अशी मागणी केली होती. या सर्व प्रकारानंतर आज फडणवीस यांनी ट्विट करून दिलगिरी व्यक्त केली. 

''छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनी केलेल्या ट्विटमध्ये चूक झाल्याचे लक्षात येताच लगेच मी ते ऑफिसला दुरुस्त करण्यास सांगितले. शाहू महाराज यांचा अनादर करण्याचे कधी माझ्या मनात सुद्धा येऊ शकत नाही. तथापि यामुळे भावना दुखावल्या गेल्यात. सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो.'' असे ट्विट फडणवीस यांनी केले. 

<

>

कोल्हापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१२व्या वर्षी हरवलेला मुलगा २५व्या वर्षी परतला; गावात गेला तर घर नव्हते, पण आई दिसली… नंतर जे घडलं ते शब्दांच्या पलीकडचं

Maharashtra Election Update : राज्यातील राजकारण ढवळून निघणार! जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक कधीही होणार जाहीर? महत्त्वाची अपडेट समोर...

Viral Video : सीमेवर ड्युटी करताना स्वत:चाच वाढदिवस विसरला फौजी, मुलीने व्हिडिओ कॉल केला अन्... व्हायरल व्हिडिओने जिंकली लाखोंची मनं

PCMC Election : भाजपकडून दादा लक्ष्य! पिंपरीतील कारभारावरून बावनकुळे यांचे टीकास्त्र

Latest Marathi News Live Update : राज्यात ढगाळ हवामान, किमान तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT