Former Mayor More and his colleagues have cremated many unclaimed bodies in belgum 
कोल्हापूर

'ते' मरण पावल्याचे दोन दिवसानंतर कळले अन्...

सकाळवृत्तसेवा

बेळगाव - टिळकवाडीतील महर्षी रोडवरील आपल्या घरात ते एकटेच राहत होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला, पण त्यांचे शेजारी, भाऊ किंवा नातेवाईक यापैकी कोणालाही त्याची माहिती नव्हती. मंगळवारी (ता.9) त्या घरातून दुर्गंधी येवू लागल्यानंतर शेजाऱ्यांना संशय आला. त्यानी त्याबाबत टिळकवाडी पोलिस ठाण्याला माहिती दिली. माजी महापौर विजय मोरे, सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यानाही माहिती देण्यात आली. कोरोनामुळे धास्तावलेल्या बेळगावात अशा अचानक मृत पावलेल्या अनोळखी व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी कोण पुढे येणार? असा प्रश्‍न होता. पण विजय मोरे, दरेकर व त्यांच्या सहकाऱ्यानी पुढाकार घेत त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. त्या व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचे टिळकवाडी पोलिसानी स्पष्ट केले. त्या व्यक्तीचा भाऊ नोकरीनिमित्त बाहेरगावी असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याच्याशी संपर्क साधण्यात आले. भावानेही मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची परवानगी दिली. त्यावर मग शहापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

महर्षी रोडवरील विवेक चव्हाण या 52 वर्षीय व्यक्तीच्या बाबतीत हा प्रकार घडला. विवेक हे आपल्या घरी एकटेच राहत होते. राहत्या घरीच त्यांचा मृत्यू झाला, पण घरी कोणीच नसल्यामुळे त्याची माहिती त्यांचे भाऊ अनिल किंवा नातेवाईकांना मिळालीच नाही. शेजाऱ्यांनी पोलिसांना कळविल्यानंतर हा प्रकार कळला. विवेक यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे कळाले नसल्यामुळे त्यांच्यावर अंत्यसंस्कार कोण व कसे करणार? हा प्रश्‍नही उद्भवला. पण पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केल्यानंतर त्यांचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचे सांगीतले. त्यामुळे मग अंत्यसंस्काराचा मार्ग मोकळा झाला. माजी महापौर मोरे, दरेकर, राजू भातकांडे, ऍड रवी इंचल, आदींना मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी स्विकारली. महापालिकेच्या शववाहीकेचे चालक निसार समशेर यांना तातडीने बोलावून घेण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी आवश्‍यक साहित्याची जुळवा-जुळव करण्यात आली. लाकडे जमा करण्यात आली. भविष्यात समस्या उद्भवू नये यासाठी विवेक यांचा भाऊ अनिल याच्याशी संपर्क साधण्यात आला. बाहेरगावी असल्यामुळे भाऊ अंत्यसंस्काराठी येवू शकत नसल्याचे पोलिसानी सांगीतले. त्यामुळे मग मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनीच अंत्यसंस्काराची जबाबदारी घेतली व अंत्यसंस्कार केले.

कोरोनाच्या धास्तीमुळे जीवंत माणसे एकमेकांच्या संपर्कात येणे टाळत आहेत. अशा स्थितीत एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कोण पुढे येणार? असा प्रश्‍न उद्भवू शकतो. पण माजी महापौर मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आजवर अनेक बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. पण कोरोना काळातही त्यानी आपले हे काम सुरूच ठेवले. त्यामुळे मंगळवारी विवेक यांच्या मृतदेहावर विधीवत अंत्यसंस्कार झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaipur Accident: भीषण अपघात! डंपरची ४० वाहनांना धडक; ५० जणांना चिरडलं, ११ लोकांचा जागीच मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

Nashik Cctv Network : सिंहस्थ अवघ्या दीड वर्षांवर; पण नाशिकचा 'तिसरा डोळा' बंदच! १० वर्षांनंतरही सीसीटीव्हीचे जाळे अपूर्ण

Latest Marathi News Live Update : कोंढवा हत्या प्रकरणातील आरोपी सराईत गुन्हेगार; मुख्य आरोपीवर सात गुन्ह्यांची नोंद

Mumbai News: रिक्षाचालकांची दादागिरी! नियमापेक्षा जादा भाडे आकारतात; प्रवाशांच्या खिशाला कात्री 

Crime: तुझ्याशी बोलायचंय, काम झाल्यावर भेट...; विवाहित प्रियकरानं महिलेला बोलवलं, भयंकर कट रचून संपवलं, कारण काय?

SCROLL FOR NEXT