Former MP Dhananjay Mahadik car story in kolhapur single number to all vehicles Date of birth and the sum of digits is six 
कोल्हापूर

माजी खासदार धनंजय महाडिकांसाठी आजही 'तो' नंबर ठरतोय हिट

संदीप खांडेकर

कोल्हापूर : भीमा उद्योग समूहाचे नाव घेतल्यावर धनंजय महाडिक यांची प्रतिमा डोळ्यांसमोर येते. सदरबाजारातल्या राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालयाचे ते विद्यार्थी. कबड्डीत महाविद्यालयाचा दरारा मोठा. मैदानावर कबड्डीतले डावपेच ते शिकले. लाल मातीतल्या कुस्तीची रग त्यांच्या अंगात बालपणापासून मुरली होती. डाव-प्रतिडावांच्या या खेळाने त्यांना राजकारणाच्या रणांगणात शड्डू ठोकण्यासाठी बळ पुरवले. धनंजय महाडिक युवाशक्तीचा परीघ जिल्हाभर पसरला. कार्यकर्त्यांचा एक जथ्था त्यांच्या नेतृत्वाखाली एकवटला अन्‌ सोळाव्या लोकसभेचे ते खासदार झाले. घरात गाड्यांची आवक वाढत असताना प्रत्येक गाडीवर मात्र ५५७७ क्रमांकाचा हट्ट धरला गेला. विशेष म्हणजे तो हिट ठरला.
 

धनंजय महाडिक ओरिएंटल इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी. अस्खलित इंग्रजी बोलण्याचे बाळकडू येथे त्यांना मिळाले. संसदेत सर्वसामान्यांचे प्रश्न मांडताना या भाषेची उपयुक्तता प्रकट झाली. महाविद्यालयीन जीवनात त्यांच्या दिमतीला दोन बुलेट होत्या. त्यांचा क्रमांक ५५७७ होता. यातील अंकांची बेरीज २४ होते. २४ म्हणजेच २ अधिक ४ यांची बेरीज येते ६. १५ जानेवारी ही त्यांची जन्मतारीख अन्‌ या अंकांची बेरीजही ६. गाडीच्या नंबरप्लेटवरील आकडेमोडही सहाच. दुचाकीनंतर मारुती कार आली. महिंद्राही जनसंपर्कासाठी जिल्हाभर धावत राहिली. महाडिक कुटुंबीयांच्या गाड्यांवरील नंबर नागरिकांच्या डोळ्यांत बसला. गावागावांत महाडिक युवाशक्तीच्या शाखा स्थापन झाल्या. शिवसेनेच्या उमेदवारीवर महाडिक यांनी २००४ ला निवडणूक लढवली. यशाने हुलकावणी दिल्यानंतर पुन्हा २००९ च्या मैदानात ते उतरले. महाडिक यांच्या कार्यकर्त्यांचा गट तळागाळात पोचत असताना प्रबळ बनला.


५५७७  क्रमांक महाडिक कुटुंबीयांचा ब्रॅंड म्हणून परिचित होऊ लागला. महाडिक यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत प्रचाराचे रान उठवले. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केलेल्या संपत्ती विवरणपत्रात महाडिकांकडील टाटा सफारी, आय टेन, लॅन्ड रोवर, मर्सिडीज बेंझ, १६१६ टॅंकर लेलॅंड, स्कोडा सुपर्ब, मर्सिडीज बेंझ जीएलएस, टोयाटो इनोव्हा गाड्यांची नोंद झाली. गाड्यांचे क्रमांक सारखेच असल्याने कार्यकर्त्यांची धावपळ नित्याची झाली. निवडणुकीत विजयाचा गुलाल उधळून महाडिक यांनी मैदान मारले. 


महाडिकांच्या कार्याची खबर दिल्ली दरबारापर्यंत पोचली. सलग दोन वर्षे त्यांना संसदरत्न पुरस्कारही मिळाला. पत्नी अरुंधती, मुलगे पृथ्वीराज, कृष्णराज व विश्वराज यांच्या गाड्यांवर सारखाच (तोच) नंबर झळकला. इतकेच काय, पण महाडिक यांच्या आई, बहीण यांच्या गाडीसाठी हाच नंबर आकर्षण ठरला.

मोबाईलचे अखेरचे  अंक ५५७७
 श्री. महाडिक म्हणतात, ‘सहा नंबर आमच्यासाठी लकी आहे. माझ्या मोबाईलच्या अखेरचे चार अंक ५५७७ असेच आहेत. घरातील फोन असो किंवा गाड्यांचे नंबर; कार्यकर्त्यांच्या सहज लक्षात राहतात.’


संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT