Former MP Shankarrao Mane occasion of the birth centenary 
कोल्हापूर

ब्रिटिशांना सळो की पळो करणारे लढवय्ये स्वातंत्र्यसेनानी शंकरराव माने

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : ब्रिटिशांना सळो की पळो करणारे लढवय्ये स्वातंत्र्यसेनानी आणि गोरगरिबांसाठी अव्याहत झटलेले कोल्हापूरचे माजी खासदार शंकरराव माने यांची आज, १५ डिसेंबरला जयंती. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त...

शंकरराव माने यांचा जन्म १५ डिसेंबर १९२० रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांचे वडील दत्तात्रेय सगनोजी माने हे ब्रिटिश सरकारमध्ये महसूल प्रशासनात नायब तहसीलदार होते. शंकररावांचे शालेय शिक्षण गारगोटी व गडहिंग्लज येथे झाले. राजाराम कॉलेजातून इंटर सायन्स करत असतानाच सन १९४२ ला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून भारताला मुक्त करण्यासाठी महात्मा गांधींनी ब्रिटिशांना ‘चले जाव’चा आदेश दिला आणि शंकरराव माने त्यामध्ये सहभागी झाले. देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार, भाई माधवराव बागलांच्या मार्गदर्शनाखाली ते भूमिगत राहून चळवळीचे नेतृत्व करू लागले.

चळवळीची कार्यप्रणाली सर्व क्रांतिवीरांपर्यंत पोहोचण्यासाठी बातमीपत्र छापून भूमिगत सेनानींपर्यंत वितरण करण्यासाठी लागणाऱ्या खर्चासाठी पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथील खजिना लुटण्याचे ठरले. इचलकरंजीचे एस. पी. पाटील, माधव कुलकर्णी यांच्यासमवेत भीमा नदीकाठी अपराध मास्तरांच्या मळ्यात भूमिगत बैठक होऊन २७ जुलै १९४३ ला नियोजन ठरले. त्यानुसार जेजुरीत अभिषेकाच्या बहाण्याने प्रवेश करून खजिना लुटला. पुढे खटला चालून शंकरराव माने यांच्यासह माधव कुलकर्णी, दत्तोबा तांबट, शिवगोंडा पाटील आणि बाबूराव चौगुले यांना तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा झाली. त्यांनी कोल्हापूरच्या शालिनी पॅलेस येथे जयवंतराव सरनाईक, डॉक्‍टर यशवंत कुलकर्णी, श्‍याम जिरगाळे, लालजी उपाध्ये, लक्ष्मण मिसाळ, अहमद मुल्ला, बाळ वर्धमाने, चिकोडी, संकपाळ, अब्दुल अथणीकर यांच्यासह दरोडा टाकला.

आज शिवाजी चौकात जेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिमाखात उभा आहे तेथे इंग्रज गव्हर्नर लॉर्ड विल्सन यांचा पुतळा होता. शंकररावांसह काका देसाई, तांबट काका, वसंतराव तावडे, राम घोरपडे, हिंदुराव घाडगे, नारायण जगताप, शामराव पाटील, व्यंकटेश देशपांडे आणि इतर सहकाऱ्यांनी पुतळा स्वच्छ करण्याच्या बहाण्याने पंधरा मिनिटांत तो उद्‌ध्वस्त केला. त्यानंतर भालजी पेंढारकर यांच्या पुढाकाराने बाबूराव पेंटर यांनी तयार केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तेथे बसविण्यात आला.


मिरज-बार्शी या लाईट रेल्वेमधील ब्रिटिशांचा खजिना सलगरे ते ढालगाव दरम्यान लुटला. त्यामध्येही शंकरराव माने अग्रेसर राहिले. अनेक वर्षे भूमिगत राहून ते स्वातंत्र्यासाठी लढत राहिले. त्यासाठी तुरुंगवासही भोगला. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. कोल्हापूरमध्ये प्रजा परिषदेचे काम सुरू झाले. शंकरराव मानेसाहेब यांनी त्यातही योगदान दिले. त्यांचे काम पाहून १९४८ ते १९५२ पर्यंत मुंबई प्रांताचे आमदार म्हणून त्यांना संधी मिळाली. या कालखंडात त्यांनी गरीब, वंचित, उपेक्षित, शोषित घटकांसाठी काम केले. १९५४ मध्ये पुणे विभाग विकास मंडळाचे सचिव म्हणून त्यांना संधी मिळाली. त्यांनी कोल्हापूरमध्ये कोल्हापूर जनता कन्झ्युमर स्टोअर्स (जनता बझार) ची स्थापना केली. त्यांच्या कामाचा झपाटा पाहून कोल्हापूर जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाली.

१९६७ मध्ये त्यांना काँग्रेसने लोकसभेची उमेदवारी दिली आणि ते खासदार म्हणून निवडून आले. ते नेहमी इंदिरा गांधींसोबत खंबीरपणे उभे राहिले. त्यांच्या या सर्व कार्यामध्ये त्यांच्या पत्नी सौ. शशिकला यांचेही योगदान मोलाचे राहिले. २००३ मध्ये त्यांना कोल्हापूर महापालिकेतर्फे कोल्हापूर भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. ८ ऑक्‍टोबर २०१० रोजी त्यांची इहलोकीची यात्रा संपली आणि आयुष्यभर देशसेवेचे व्रत घेतलेली एक संघर्षयात्रा थांबली.

- प्रा. मधुकर पाटील, सिनेट सदस्य- शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar On Narendra Modi : मोदींनी ७५ व्या वर्षी राजकारणातून निवृत्त व्हावं का? शरद पवारांनी एका वाक्यात सांगितलं, देवाभाऊंवरी टीका

Gadchiroli News: दोन महिला माओवाद्यांना कंठस्नान; गडचिरोली जिल्ह्यातील मोडस्के जंगल परिसरात चकमक

Gold Rate Today : सोन्यात घसरण सुरुच,चांदीही झाली स्वस्त; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Teacher Recruitment : 'राज्यात सरकारी-अनुदानित शाळांमध्ये तब्बल 18,500 नवीन शिक्षकांची भरती करणार'; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

बाबो! सुरज चव्हाणचं खरंच लग्न ठरलं? सोशल मीडियावर शेयर केलेली पोस्ट चर्चेत, चाहत्यांचा म्हणाले..."हीच का आपली वहिनी?"

SCROLL FOR NEXT