Officers and reading staff took out their pocket pockets and fitted them into their homes kolhapur marathi news 
कोल्हापूर

अन्... घरातील ४० वर्षांचा अंधार झाला दूर...

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - घरात चाळीस वर्षांचा अंधार. दिवा लावूनच घराला प्रकाशमान करण्याचा खटाटोप. वीज घेण्यासाठी ना पैसे, ना अर्ज करण्याची माहिती. प्रतिकूल परिस्थितीला भेदण्याचं सामर्थ्यचं नाही, तिथं घरात वीज देणारा मदतीचा हातही नाही. महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या हृदयाला फुटलेल्या पाझरानं मात्र यळगूडच्या (ता. हातकणंगले) पार्वतीबाई कांबळे यांचं घर प्रजासत्ताकदिनी प्रकाशमान झालं. 

अधिकार्यांनी घातले स्वत:च्या खिशातील पैसे

पार्वतीबाई यांच वय ऐंशीहून अधिक. त्यांच विटा-मातीच साधं कौलारू घर. जेवणासाठी चूल आणि भिंतीवरील फळ्यांवर भांड्यांची रांग. वीज नसल्याने दिवा लावूनच त्या जेवण करायच्या. आठवडाभरापूर्वी वीजमीटर रिडींग एजन्सीचे म्हाळू मुदाळे यांना त्यांच्या घरात वीज नसल्याची माहिती मिळाली. त्यांनी ती अधिकाऱ्यांच्या कानावर घातली. अधिकारी व रिडींगच्या कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या खिशातील पैसे काढून त्यांच्या घरात फिटिंग केले. हुपरीचे उपकार्यकारी अभियंता रामेश्वर कसबे, हुपरी ग्रामीणचे शाखा अभियंता सोमय्या जमादार, हुपरीचे सुनील मंगसुळी व रिडींग एजन्सीचे म्हाळू मुदाळे यांनी मीटर बसवून घर प्रकाशमान केले.

पार्वतीबाई आजही कष्ट करून उदरनिर्वाह करतात. त्यांना वीजबिल देणे शक्‍य नाही. त्यांचा बीपीएल योजनेत समावेश केला जाणार आहे. त्यांचे वीजबिल महावितरण व मीटर रीडिंग एजन्सीचे कर्मचारी भरतील. 
- रामेश्‍वर कसबे, उपअभियंता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT