found under a mound of mud in Beerenahalli and killed belgaum marathi news 
कोल्हापूर

बिरनहळ्ळीत मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून दोघे ठार 

सकाळ वृत्तसेवा

हुक्केरी(बेळगाव) : राष्ट्रीय महामार्गापासून नजीकच असलेल्या बिरनहळ्ळी (ता. हुक्केरी) येथे मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून दोघे जण ठार झाले. सोमवारी (ता. १) सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हालाप्पा गुरव (वय २४, रा. बिरनहळ्ळी) व यल्लाप्पा हरीजन (वय २२) अशी मयत झालेल्यांची नावे आहेत. यमकनमर्डी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करून घेण्याचे काम सुरू आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, 
राष्ट्रीय महामार्गापासून जवळच बिरनहळ्ळी येथून रस्ताकामासाठी माती व मुरूम नेण्याचे काम सुरू होते. यावेळी मातीची ढिगारा हालाप्पा गुरव व यल्लाप्पा हरीजन यांच्या अंगावर कोसळला. त्याखाली दबले जावून दोघांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच यमकनमर्डी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश पाटील यांच्यासह सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिक तपास पोलिस करत आहे. 


मातीच्या ढिगाऱ्याखाली दोघे ठार झाल्याची माहिती सर्वत्र वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी गर्दी झाली आहे. पोलिसांनी मृतदेह ढिगाऱ्याबाहेर काढले असून उत्तरीय तपासणीसाठी आरोग्य केंद्रात नेण्याची तयारी केली आहे. दोघांच्या मृत्यूमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून त्याचीच चर्चा सुरू आहे.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT