fraud with one lakh rupees admission for mbbs in kolhapur 
कोल्हापूर

'एमबीबीएस' पदवीसाठी प्रवेश मिळवून देतो म्हणत घातला लाखाला गंडा

राजेश मोरे

कोल्हापूर : 'एमबीबीएस' पदवीसाठी प्रवेश मिळवून देतो अमिष दाखवून ओडीसातील दोघा भामट्यानी लाखाचा गंडा घातला. याप्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. सोहाना मॅडम, बिनय कुमार प्रशान (दोघे रा. माचुर्ली, सलेपूर कटक, ओडीसा) अशी त्या संशयितांची नावे आहेत. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वसंत गणपती शेटे हे बालिंगा (ता. करवीर) परिसरात राहतात. त्यांच्या मोबाईलवर 29 नोव्हेंबर 2000 मध्ये एक संदेश आला. यात 'एमबीबीएस' पदवीसाठी 30 लाख रूपयात प्रवेश मिळून देतो असा मजकूर होता. त्यात नमुद केलेल्या मोबाईल क्रमांकावर त्यांनी संपर्क साधला. तो मोबाईल क्रमांक संशयित 'सोहाना' नावाच्या महिलेचा होता. तिने प्रवेशाबाबत चर्चा केली. तिने वरिष्ठ अधिकारी म्हणून संशयित बिनयकुमार प्रधान यांचा मोबाईल क्रमांक दिला. 

शेटे यांनी त्याच्याशीही मोबाईलवर चर्चा केली. त्याने 12 लाख रूपयांत प्रवेश मिळवून देतो असे सांगून बॅंकेच्या खात्यावर एक लाख रूपये भरण्यास सांगितले. त्यानुसार शेटे यांनी त्याच्या खात्यावर एक लाख रूपये भरले. मात्र त्यानंतर संशयित बिनयकुमार हा अधिक रक्कमेची मागणी करू लागला. दोघा संशयितांनी एक लाखाची फसवणूक केल्याची फिर्याद शेटे यांनी दिली. दोघा संशयितांच्या प्राप्त झालेल्या मोबाईल क्रमांकाद्वारे पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT