fraud on social media with one person rupees 3.25 lakh in kurundwad kolhapur police arrested him 
कोल्हापूर

‘तू माझ्याशी चॅटिंग केले आहेस, थांब तुझी दिल्लीत तक्रार करतो' म्हणत घातला सव्वातीन लाखांना गंडा

सकाळ वृत्तसेवा

कुरुंदवाड (कोल्हापूर) : बनावट फेसबुक अकाउंटवर मैत्री करून मोबाईलवर अश्‍लील संभाषण व चॅटिंग केले. त्याच्या आधारे ‘तुझी पोलिसांत तक्रार देईन,’ अशी धमकी देऊन तीन लाख पंचवीस हजार रुपये उकळले, तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नागराज शंकर दैवज्ञ (वय ३०, रा. कबनूर ता. शिगाव जि. हावेरी, कर्नाटक)  याला शिरोळ पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत अमोल रावसो लठ्ठे (रा. घोसरवाड ता. शिरोळ) यांनी येथील पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की सप्टेंबरमध्ये फेसबुकवर अमोल लठ्ठे यांची नागराज दैवज्ञ याच्या राणी या नावाने असलेल्या बनावट फेसबुक अकाउंटवर मैत्री झाली व एकमेकांशी मोबाईलवर अश्‍लील चॅटिंग करू लागल्यानंतर लठ्ठे व दैवज्ञचे एकमेकांशी बोलणे सुरू झाले. या अश्‍लील चॅटिंगचा दैवज्ञ याने गैरफायदा घेऊन ‘तू माझ्याशी अश्‍लील चॅटिंग करून अश्‍लील फोटो टाकला आहेस, तुझी दिल्लीत तक्रार करतो.’ अशी धमकी देऊन दीड लाखाची मागणी केली.

भीतीपोटी अमोल याने दीड लाख रुपये गुगल पेवरून दैवज्ञ याला दिले. त्याने पुन्हा ८ डिसेंबरला अमोल याला फोन करून आणखी दीड लाखाची मागणी केली. त्यावेळी अमोलने घोसरवाड येथील नेटकॅफेमधून गुगल पे मधून दीड लाख रुपये दिले. त्यानंतर तुझे चॅटिंग केलेले प्रूफ माझ्या मोबाईलवर आहे. ते तुला परत देतो, म्हणून ५० हजार दे, अशी मागणी केली व कोल्हापूर येथे येण्यास सांगितले. अमोल लठ्ठे याने राजवाडा पोलिस ठाण्यात ही माहिती दिली. राजवाडा पोलिसांनी दैवज्ञ याला रंकाळ्यासमोरील डी-मार्टजवळ ताब्यात घेऊन कुरुंदवाड पोलिसांच्या स्वाधीन केले.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

Pachod News : चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या धमकीने घाबरलेल्या शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन संपविले जीवन

Latest Marathi News Updates: भाजपमध्ये घराणेशाही नाही- देवेंद्र फडणवीस

कोकणातलं तुम्हाला काय आवडलं? दिलीप प्रभावळकर म्हणाले, 'ते पाहून मीच चकीत झालो कारण...

BCCI ची अब्जावधींची कमाई होते तरी कशी? भारताच्या तुलनेत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड किती कमावतो पैसा, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT