Free swab test to be held in Kolhapur  
कोल्हापूर

मोठी बातमी - कोल्हापुरात आता होणार मोफत स्वॅब तपासणी  

निवास चौगले

कोल्हापूर : कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी महानगरपालिकेच्यावतीने शहरातील आयसोलेशन हॉस्पिटलसह दहा कुटुब कल्याण केंद्राच्या ठिकाणी शहरातील नागरिकांचे मोफत स्वॅब घेण्याची सुविधा करण्यात आली आहे. 

शहरातील लोकांची कोरोना टेस्ट घेण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. आतापर्यंत सीपीआर आणि आयसोलेशन हॉस्पिटल येथेच मोफत स्वॅबची सुविधा उपलब्ध केली होती. शहरवासियांची मागणी आणि रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन महानगरपालिकेने आता सीपीआर आणि आयसोलेशन पाठोपाठ शहरातील दहा कुटुंब कल्याण केंद्राच्या ठिकाणी मोफत स्वॅब घेण्याचे नियोजन केले आहे.

मोफत स्वॅब घेण्यासाठी शहरात निश्‍चित केलेल्या दहा कुटुंब कल्याण केंद्रामध्ये कुटुंब कल्याण केंद्र फिरंगाई हॉस्पिटल, कुटुंब कल्याण केंद्र राजारामपुरी, कुटुंब कल्याण केंद्र कसबा बावडा, कुटुंब कल्याण केंद्र महाडीक माळ, कुटुंब कल्याण केंद्र फुलेवाडी, कुटुंब कल्याण केंद्र सदर बाजार, कुटुंब कल्याण केंद्र सिध्दार्थनगर, कुटुंब कल्याण केंद्र मोरेमाने नगर यांचा समावेश आहे.

शहरातील सावित्रीबाई फुले हॉस्पिटल आणि पंचगंगा हॉस्पिटल ही कुटुब कल्याण केंद्रे केवळ गरोदर मातांसाठी राखून ठेवण्यात आली आहेत. तरी शहरातील नागरिकांनी महानगरपालिकेच्या 10 कुटुब कल्याण केंद्रांवरील मोफत स्वॅब तपासणी उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: बापरे! कोथरूडमध्ये रस्ता खचला, ट्रक फसला... व्हिडिओ व्हायरल

काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपची घुसखोरी! काँग्रेसला तिसरा झटका; थोपटे, धंगेकरांनंतर 'हा' माजी आमदार पक्षाला देणार सोडचिठ्ठी?

Latest Maharashtra News Updates : प्रेयसीला दिली रबडीतून गर्भपाताची गोळी; पुण्यातील हिंजवडीमधील धक्कादायक प्रकार

iPhone 15 Price Drop: आयफोन प्रेमींसाठी खुशखबर! iPhone 15 वर मिळतोय चक्क 12 हजारचा डिस्काउंट, इथे सुरु आहे सुपर ऑफर

कुणाला गद्दार म्हणतो, बाहेर ये तुला दाखवतो; विधानसभेत मंत्री देसाई आणि परब यांच्यात जुंपली, सभागृहात राडा

SCROLL FOR NEXT