कोल्हापूर

कोल्हापुरात पुनर्वसनासाठी आजपासून तालुकानिहाय बैठका

सकाऴ वृत्तसेवा

काही ठिकाणी पाणी ओसरण्यास वेळ लागल्यामुळे शेतीचे पंचनामे झालेले नाहीत ते मंगळवारपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना प्रांताधिकाऱ्यांना दिल्याचेही पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

कोल्हापूर: कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी आज (ता. २०) किंवा शनिवारी तालुकानिहाय लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कायमस्वरुपी पुनर्वसनाचा आराखडा करणार असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदानासाठी सतरा कोटी जमा झाले आहेत. आजपासून पूरग्रस्तांना दहा हजार सानुग्रह अनुदान खात्यावर देण्याचे काम सुरू होईल. साधारण आठवड्यात ते पूर्ण केले जाईल. काही ठिकाणी पाणी ओसरण्यास वेळ लागल्यामुळे शेतीचे पंचनामे झालेले नाहीत ते मंगळवारपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना प्रांताधिकाऱ्यांना दिल्याचेही पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

शासनाच्या कोणत्या योजनेतून पूरग्रस्तांचे पुनर्वसन होईल याची माहिती दिली जाईल. रमाई, शबरी, पंतप्रधान आवास, यासह इतर राज्य आणि केंद्र शासकीय योजनांची माहिती, किती जमीन उपलब्ध आहे, किती कुटुंबाचे पुनर्वसन होणार याची माहिती दिली जाईल, त्यानंतर तो परिपूर्ण आराखडा तयार होईल, अशीही माहिती पालकमंत्री पाटील यांनी दिली. शहरातील रस्त्यांसाठी निधी मंजूर झाला असून त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण करून डिसेंबरपासून काम सुरू होईल, पूरग्रस्त भागात साधारण १३ प्रभागातील कामांना येथे प्राधान्य दिले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पंचनामे, अनुदान वाटपामुळे ऑक्टोबर ३१ नंतरच ओढ्यांची स्थिती, त्यांचे मोजमाप, रूंदी यांची माहिती घेण्याचे काम सुरू होईल. त्याचे नकाशे तयार आहेत, त्याची आणि सध्याची नेमकी स्थिती काय आहे याची माहिती घेतली जाईल. त्यानंतर गाळ काढणे, रुंदी, खोली वाढविणे यासह इतर कामांना प्राधान्य दिले जाईल. हेच काम शहरासह जिल्ह्यात होईल, असेही पालकमंत्री सतेज पाटील यांनी स्पष्ट केले.

आरोपांची शहानिशा करू

कोल्हापूर शहरात झालेली पूररेषा चुकीची असून पूर्वीची बदलून ५०० हेक्टर जमीन सोडविल्याचा आरोप एनजीओंकडून केला असल्याबद्दल विचारले असता हा विषय पूर्वीच्या सरकारमधील आहे. त्याची टेक्निकल माहिती घेऊ. नेमके हे आरोप का झाले आहेत, याची माहिती घेतली जाईल. त्यानंतर योग्य ती निर्णय घेतला जाईल, असेही पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup साठी तिलक वर्माचे होणार टीम इंडियात पुनरागमन? दुखापतीबाबत आली महत्त्वाची अपडेट

Latest Marathi News Live Update : हद्दपार आरोपीने टाकीवरून उडी घेत संपवलं

मी तो सिनेमा उगाच केला असं... केदार शिंदेंनी सांगितलं 'झापुक झुपूक' अपयशी ठरण्याचं कारण; म्हणाले- त्या मुलाला

CET Application Update 2026: नाव वेगळे? काळजी करू नका! आता सीईटी अर्ज आता रद्द होणार नाही

Malegaon Municipal Corporation : बिनशर्त पाठिंबा की अटी-शर्तींचा पेच? काँग्रेस आणि एमआयएमच्या भूमिकेकडे मालेगावचे लक्ष

SCROLL FOR NEXT