gas prices
gas prices sakal media
कोल्हापूर

कोल्हापूर : इंधन दरवाढीचा भडका

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: पेट्रोल, डिझेल गॅसच्या दरांचा भडका दिवसेंदिवस वाढत आहे. निवडणुकीनंतर दरवाढ होईल, महागाई होईल, अशा अंदाजाला यामुळे पुष्टी मिळाली. पेट्रोल-डिझेलच्या दराचे दर रोज ८० पैशांनी वाढत आहेत. यामुळे कळत न कळत वाहतूक खर्च वाढत आहे. धान्यांसह इतर वस्तूंच्या किमती वाढण्याचे संकेत मिळत आहेत. तसेच रोज वापरात असलेला घरगुती गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महागला आहे. तो आता ९५३ रुपयांपर्यंत पोचला आहे. याची ‘सबसिडी’ बंद झाली आहे, मात्र पगार, मानधनात वाढ होत नसल्यामुळे सर्वसामान्यांची आर्थिक विवंचना दिवसेंदिवस वाढत जात आहेत.

घरगुती गॅस सिलिंडर आणि पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा फटका थेट चुलीपर्यंत बसतो. दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. कोविडनंतर पुन्हा बाजारपेठ रुळावर येत असतानाच अनेकांना पगारवाढसुद्धा नाही. कोविडमध्ये अनेकजण कर्जबाजारी होत आहेत. दिवसांगणिक वाढत असलेल्या महागाईमुळे जमा-खर्चाचा मेळ घालताना गृहिणींनासुद्धा नाकी नौ येत आहे. तेलाचे, गव्हाचेही दर वाढत आहेत. यामध्ये अत्यावश्‍यकच असलेल्या पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरचाही दर वाढल्यामुळे महागाईचे चटके अधिक वाढत आहेत.

युक्रेन आणि रशिया युद्धामुळे पेट्रोल-डिझेल दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ही वाढ आणखी काही दिवस अशीच राहणार आहे. लवकरच १२० ते १२५ रुपयाने एक लिटर पेट्रोल घ्यावे लागणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारने कर कमी केला तरच दरवाढ रोखता येईल.

-गजकुमार मानगावे, अध्यक्ष, जिल्हा पेट्रोल डीलर असोसिएशन

इंधन दरवाढ अशी २४ मार्च

पेट्रोल दर १११-४६ रुपये

डिझेल ९४-३१- पेट्रोल दरात ८३ पैशांची व डिझेल दरात ८३ पैशांची वाढ.

२५ मार्च

पेट्रोल ११२-३० रुपये

डिझेल ९५-१४ रुपये- पेट्रोल दरात ८४ पैशांची व डिझेल दरात ८३ पैशांची वाढ

२६ मार्च

पेट्रोल ११३ -१८ रुपये

डिझेल ९५-९६ रुपये. - पेट्रोल दरात ८२ पैशांची व डिझेल दरात ८२ पैशांची वाढ

कमर्शियल

गॅस सिलिंडर

मागील महिन्यात - १९७२ रुपये

१ मार्च -१९८७.५० रुपये

२२ मार्च -१९७७. ५० रुपये

घरगुती गॅस

मागील महिन्यात - ९०३ रुपये

२२ मार्च- ९५३ रुपये

महिन्यात ५० रुपयांची वाढ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

LSG vs MI IPL 2024 : लखनौनं मुंबईची कडवी झुंज काढली मोडून; गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप

SCROLL FOR NEXT